Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दीपिका पदुकोण रात्री उशिरा रुग्णालयात दाखल, अचानक आजारी पडली

दीपिका पदुकोण रात्री उशिरा रुग्णालयात दाखल, अचानक आजारी पडली
, बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (09:33 IST)
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनची प्रकृती बिघडल्यामुळे काल रात्री तिला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
वृत्तानुसार,  दीपिका पदुकोणने रात्री उशिरा अस्वस्थतेची तक्रार केल्यानंतर तिला मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तथापि दीपिकाच्या कुटुंबीय किंवा मित्रांकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्टेटमेंट समोर आलेले नाही. 
 
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार दीपिका आता पूर्वीपेक्षा बरी आहे. मात्र सध्या तरी सर्व अधिकृत बातमीची वाट पाहत आहेत. ही बातमी कळताच चाहते दीपिकाची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.
 
दीपिका पदुकोणची तब्येत एक महिन्यापूर्वी देखील बिघडल्याचे सांगितले जाते ज्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये जावे लागले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Navratri 2022 : पाकिस्तान आणि श्रीलंकेसह जगभरात या ठिकाणी आहेत 51 शक्तीपीठे, जाणून घ्या कुठे आहे सिद्ध मंदिर