अमरावतीच्या जिल्हा स्त्री रूग्णालयात मुलांच्या अति दक्षता विभागात अचानक आग लागली. या आगीची माहिती मिळतातच वॉर्ड मधील मुलांना तातडीनं दुसऱ्या वार्डात हलवण्यात आले, या अपघातात दोन मुलं किरकोळ जखमी झाले आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार सकाळी अमरावतीतील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या मुलांच्या अतिदक्षता विभागात अचानक आग लागली. आगीची माहिती मिळतातच रुग्णालयातील स्टाफ, डॉक्टर, आणि मुलांचे नातेवाईकांनी धाव घेत लहान मुलांना तातडीनं दुसऱ्या वार्डात हलविले या मध्ये दोन मुलं किरकोळ जखमी झाले आहे.
आग लागल्यामुळे वार्डात धूर पसरल्यामुळे मुलांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. या घटने मुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.