नॅशनल स्टॉक एक्स्चेंज' (एनएसई) फोन टॅपिंगप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली आहे. पांडे हे याआधी 'ईडी'च्या कोठडीमध्ये होते. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली. पांडे यांच्याविरोधात पुरेसे पुरावे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
गेल्या 30 जूनला ते मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले होते. त्याआधी राज्याचे प्रभारी पोलीस महासंचालक होते. योग्य पोस्टिंग न मिळाल्याने त्यांनी सातत्याने त्यांची नाराजी बोलून दाखवली होती.
अवैध पद्धतीने फोन टॅपिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या सीईओ चित्रा रामकृष्णन यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या संगनमताने फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
NSE च्या 91 लोकांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. चित्रा रामकृष्णन यांच्या सांगण्यावरून यांनी हे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
पांडे यांच्याशी संबंधित iSec services private limited या कंपनीच्या माध्यमातून फोन टॅप करण्यात आले होते. ही कंपनी 2001 मध्ये स्थापन करण्यात आली होती.
त्यावेळी संजय पांडे पोलीस दलात नव्हते. त्यांनी पोलीस दलाचा राजीनामा दिला होता त्यांचा राजीनामा मंजूर झाला नाही आणि त्यांना पोलीस दलात परत बोलावण्यात आलं होतं. संजय पांडे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.