Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘कसौटी जिंदगी की2’चा प्रोमो रिलीज

ekta kapoor
कसौटी जिंदगी की’ही मालिका पुन्हा एकदा परतणार आहे. एकता कपूर ही मालिका नव्या रूपात प्रेक्षकांसाठी घेऊन येतेय. एकता कपूरने नुकताच ‘कसौटी जिंदगी की2’चा प्रोमो रिलीज केला.
 
श्वेता तिवारीने साकारलेली प्रेरणा ही भूमिका या नव्या मालिकेत एरिका फर्नांडिस साकारणार असून अनुरागच्या भूमिकेत पार्थ समंथन झळकणार आहे तर कोमिलाकाच्या भूमिकेत ये रिश्ता क्या कहलाता है फेम हिना खान दिसणार असल्याची चर्चा आहे. कसौटी जिंदगी की मध्ये प्रेरणा, अनुराग, कोमालिका या व्यक्तिरेखांसोबतच मि. बजाज ही भूमिका तितकीच महत्त्वाची होती. मि. बजाज ही भूमिका रोनित रॉयने साकारली होती.त्याची ही भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. या मालिकेमुळेच रोनित रॉय हे नाव घराघरात पोहोचले. ही भूमिका बरुण सोबती साकारणार अशी चर्चा आहे. बरुण सोबतीने इस प्यार को क्या नाम दूँ, दिल मिल गये यांसारख्या अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दोन हजार कोटींची मालकीण