Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जितेंद्र- हेमाचे लग्न का नाही झाले?

जितेंद्र- हेमाचे लग्न का नाही झाले?
7 एप्रिल 1942 वर्षी अमृतसर येथे जन्माला आलेल्या अभिनेता जितेंद्र याचे खरे नाव रवि कपूर असे आहे. त्यांचे वडील खोट्या दागिन्यांचा व्यवसाय करायचे. सिनेमात शूटिंगवेळी खोटे दागिने वापरले जातात आणि त्या देणं-घेणं करायचे काम जितेंद्रकडे होते. एकदा ते महान फिल्मकार वी. शांताराम यांना दागिने पोहचवण्यासाठी गेले. तेव्हा शांताराम यांना जितेंद्रला बघून त्यात कलाकार लपला असल्याची जाणीव झाली. त्यांनी 1959 मध्ये प्रदर्शित सिनेमा 'नवरंग' मध्ये संध्या च्या डबलचा रोल जितेंद्रला करायला सांगितले. पाच वर्षाने शांताराम यांनीच जितेंद्रला 'गीत गाया पत्थरों' यात लाँच केले. यात जितेंद्रच्या अपोझिट शांताराम यांची मुलगी राजश्री होती. बघता-बघता जितेंद्र स्टार झाले.
 
हेमा-जितेंद्र आणि धर्मेंद्र यांचा एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे. जितेंद्र हेमा मालिनीवर फिदा होते. तसेच धर्मेंद्रही हेमाला पसंत करायचे. जितेंद्र आणि हेमा मालिनी गुपचुप एका मंदिरात विवाह करणार होते. परंतू धर्मेंद्रला ही गोष्ट कानावर आल्याक्षणी त्यांनी जितेंद्रची प्रेयसी शोभा कपूरला ही गोष्ट सांगितली. शोभाने लग्नात अडथळा निर्माण केला आणि नंतर जितेंद्र-शोभाचे लग्न तसेच धर्मेंद्र-हेमा यांचे लग्न झाले.
 
1967 साली रविकांत नगाइचने जितेंद्रसोबत जासूसी सिनेमा फर्ज निर्मित केली. यातील गाण्यात 'मस्त बहारों का मैं आशिक' मध्ये जितेंद्रने अगदी स्वस्तात खरेदी केलेले पांढर्‍या रंगाचे जोडे घातले होते. सिनेमा हिट झाला आणि जितेंद्रचे जोडेदेखील. नंतर पांढर्‍या रंगाचे जोडे त्यांचा ट्रेडमार्क स्टाइल बनला. नंतर अनेक सिनेमांमध्ये त्यांनी पांढरे जोडे घातले.
 
शिस्तप्रिय जितेंद्र सपाट्याने आणि वेळेवारी आपले काम पूर्ण करायचे. आपल्या फिटनेससाठी तर त्यांनी अनेक वर्ष पोळी आणि भाताला हातदेखील लावला नाही. जितेंद्र कधीच सुपरस्टार म्हणून ओळखले गेले नाही तरी दर्शकांच्या प्रेमामुळे त्यांच्या करियरची गाडी चालत राहिली. त्यांनी अनेक नायिका प्रधान सिनेमात काम केले आहे. कौटुंबिक चित्रपटांचा भाग असल्यामुळे ते महिलांमध्ये चांगले लोकप्रिय राहिले. रेखा, श्रीदेवी, जया प्रदा, हेमा मालिनी, रीना रॉयसह त्यांची जोडी पसंत केली गेली. 
 
गुलजार यांच्यासोबत केलेल्या सिनेमांमध्ये जितेंद्रच्या वेगळाच रूप बघायला मिळतो. गुलजारने जितेंद्रला वेगळा लुक दिला. कुर्ता-पायजमा, डोळ्यावर चश्मा, बारीक मिशा आणि वेगळी हेअर स्टाइल करत परिचय, किनारा, खुशबू सारखे सिनेमा जितेंद्रने यशस्वी पार पाडले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

"सासू"