Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चित्रपटप्रेमींसाठी जानेवारीचा शेवटचा आठवडा खास 3 मोठे हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार

चित्रपटप्रेमींसाठी जानेवारीचा शेवटचा आठवडा खास  3 मोठे हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार
, सोमवार, 23 जानेवारी 2023 (22:45 IST)
चित्रपटप्रेमींसाठी जानेवारीचा शेवटचा आठवडा खास असणार आहे. जानेवारीच्या पहिल्या तीन आठवड्यात जरी मोजकेच पण दमदार चित्रपट प्रदर्शित झाले. पण वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चित्रपटप्रेमींसाठी पर्वणी असणार आहे. या आठवड्यात 3 मोठे हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हिंदी व्यतिरिक्त, तमिळ, कन्नड, मल्याळम तसेच इतर भाषांमधील अनेक उत्कृष्ट चित्रपट देखील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहेत. चला तर मग या आठवड्यात 23 जानेवारी ते 29 जानेवारी या कालावधीत प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संपूर्ण यादी पाहूया.
या आठवड्यात बॉलिवूडमधील तीन मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहेत. या तिन्ही चित्रपटांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटांमध्ये बॉलिवूडचे स्टार्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यशराज फिल्म्स दिग्दर्शित 'पठान' हा चित्रपट २५ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण व्यतिरिक्त आशुतोष राणा, डिंपल कपाडिया मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहेत. तर याच पठाण चित्रपटात सलमान खान कॅमिओ करताना दिसणार आहे.
 
दुसरीकडे, दिग्दर्शक राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'गांधी गोडसे एक युद्ध' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाद्वारे संतोषी तब्बल ९ वर्षांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळत मोठ्या पडद्यावर परतणार आहे. तर दिग्दर्शक शिरीष खेमरिया दिग्दर्शित 'हू अॅम मी' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात चेतन शर्मा, ऋषिका चांदनी आणि सुरेंद्र राजन हे कलाकार मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. हे सर्व चित्रपट 23 जानेवारीपासून चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहेत.
 
23 जानेवारीला 4 तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. बॉक्स ऑफिसवर फक्त हिंदी आणि कन्नड भाषेतील चित्रपटच टक्कर देत नाहीत तर 'हंट', 'बुट्टा बोम्मा', 'धीरा' आणि 'सिंधूरम' सारखे तेलुगू चित्रपट देखील या आठवड्यात चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहेत.
 
कन्नड चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर 'क्रांती' आणि 'आरसी ब्रदर्स' हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 'थँकम' आणि 'अलोन' हे चित्रपट मल्याळममध्ये प्रदर्शित होत आहेत. तर गुजराती भाषेतील ‘कर्मा’ चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
या आठवड्यात मराठी बॉक्स ऑफिसवर देखील चित्रपटांमध्ये स्पर्धा पाहायला मिळणार आहे, म्हणजेच हा आठवडा मराठी प्रेक्षकांसाठी खूप छान असणार आहे. 'बांबू', 'पिकोलो' आणि 'तुझं माझा कलीज' हे मराठी भाषेतील चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

KL Rahul-Athiya Shetty wedding: राहुल-अथिया अडकले लग्नबंधनात