Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

प्रीती झिंटा कडेही गुड न्यूज'?

Good news
, बुधवार, 14 एप्रिल 2021 (13:00 IST)
अभिनेत्री प्रीती झिंटा ही पती जीन गुडइनसमवेत लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक झाली आहे. पण, सद्या ती भारतात आहे. नुकतीच प्रीती पतीसमवेत अभिनेता हृतिक रोशनच्या घरी आली होती. हृतिकच्या घरातून बाहेर पडताना दोघांनाही स्पॉट केले गेले होते. यावेळी प्रीतीने परिधान केलेला ड्रेस पाहून सोशल मीडियावर तिच्या प्रेग्रन्सीची चर्चा रंगली आहे. वास्तविक, अभिनेत्री अनुष्का शर्माने जेव्हा ‘गुड न्यूज'ची घोषणा केली, तेव्हा तिने सुध्दा असाच पोलका डॉट ड्रेस परिधान केला होता. तसेच हार्दिक पांड्याची पत्नी आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकनेही गरोदरपणात पोलका डॉट ड्रेस परिधान केल्यालचे दिसले होते. करिनादेखील तेव्हा अशाच ड्रेसमध्ये दिसली होती. यानंतर या ड्रेसबद्दल बर्यालच मीम्स बनवल्या गेल्या. 
 
आता प्रीतीचा हा ड्रेस पाहिल्यानंतर चाहते सोशल मीडियावर कमेंट करत विचारत आहेत की, प्रीती लवकरच गुड न्यूज देणार आहेस का? तर, कोणी म्हणतं की, हा ‘गुड न्यूज'वाला ड्रेस आहे. दरम्यान, प्रीती आणि हृतिक आगामी सीरिजची निर्मिती करणार आहेत. ‘द नाइट मॅनेजर' या कादंबरीवर आधारित ही सीरिज आहे. यासाठी हृतिकला विचारणा केली. हृतिकनेही या भूमिकेसाठी   सहमती दर्शविली आहे. ‘नाइट मॅनेजर' हा हृतिकचा ओटीटीवरील पहिला प्रोजेक्ट असणार आहे. तसेच प्रीतीदेखील पहिल्यांदाच ओटीटीवर सीरिज तयार करत आहे.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'बिबट्या'