Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खुशखबर ! आता 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोनाची लस-फायझर

खुशखबर ! आता 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोनाची लस-फायझर
, बुधवार, 31 मार्च 2021 (23:21 IST)
औषध उत्पादक फायझर यांनी बुधवारी सांगितले की, कोविड -19 लस 12 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी सुरक्षित आहे. कंपनीच्या या घोषणेकडे शाळेत जाण्यापूर्वी या वयोगटातील मुलांना लसीकरण होण्याची शक्यता म्हणून पाहिले जात आहे. त्यांची लस या मुलांवर शंभर टक्के प्रभावी असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
बऱ्याच देशांमध्ये कोविड-19 च्या लसांचे डोस प्रौढांना दिले जात आहे.ज्यांना कोरोना विषाणूंच्या संसर्गाचा धोका आहे.
फायझर लस 16 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जाण्याची परवानगी आहे, परंतु साथीचा रोग टाळण्यासाठी, सर्व वयोगटातील मुलांना देणे महत्त्वाचे आहे. तसेच शाळेत जाणाऱ्या मोठ्या वर्गातील मुलांना लसी देणे महत्त्वाचे आहे. जेणे करून ते शाळेत जाऊ शकतील.  
 
फायझर यांनी सांगितले की 12 ते 15 वर्षे वयोगटातील 2,260 अमेरिकन लोकांच्या संशोधनाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार या लसीची संपूर्ण मात्रा घेतलेल्या कोणत्याही मुला मध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्याची नोंद झाली नाही. 
दरम्यान, अमेरिकन फार्मा कंपनी फायझर आणि जर्मन बायोटेक्नॉलॉजी कंपनी बायोनॉटॅक यांनी संयुक्तपणे तयार केलेली कोविडची लस त्या नवीन प्रकारच्या कोरोनाविषाणूंपासून संरक्षण देऊ शकेल जे प्रथम ब्रिटेन नंतर दक्षिण आफ्रिकेत आढळून आले आहे.
 
 
 
  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खबरदार ! आता मात्र 'या' कठोर निर्णयासाठी तयार राहा