आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. माझी रॅपिड अॅन्टीजन टेस्ट सांगते की मी करोना पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला माझी विनंती आहे की, त्यांनी तपासणी करून घ्यावी. मी प्रत्येकाला विनंती करतो की कोरोना नियमांचे पालन करा व सुरक्षित रहा असं सचिन सावंत यांनी ट्विट केलं आहे.
तसेच, माझी रॅपिड अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे की मास्क घाला. आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असं देखील सचिन सावंत यांनी म्हटलेलं आहे.
दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना देखील करोनाची बाधा झाली आहे. रामदास कदम यांनीची आपल्या अधिकृत सोशल नेटवर्किंग पेजवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.