Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काय सांगता, कोरोनालस नियमितपणे अपडेट करण्याची गरज असू शकते

काय सांगता, कोरोनालस नियमितपणे अपडेट करण्याची गरज असू शकते
, मंगळवार, 30 मार्च 2021 (20:42 IST)
बर्लिन शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरस पासून बचाव करण्यासाठी सध्या जगभरात वापरल्या जाणाऱ्या लस नियमितपणे अपडेट करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे, कारण सध्या व्हायरसचे नवीन रूप सामोरी येत आहेत.
'व्हायरस इव्होल्यूशन' मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार याचे मूल्यमापन केले गेले आहे. संबंधित संशोधनात, बर्लिनमधील युनिव्हर्सिटॅटसमिडी या चॅरिटीच्या विषाणू शास्त्रज्ञानीं चार कॉमन कोल्ड (सर्दी पडसं)कोरोनव्हायरस, विशेषत: 229 आणि ओसी 43 व्हायरसच्या जनुकीय बदल होण्याचा अध्ययन केला. 
त्यांनी या कोरोनाव्हारसच्या स्पाइक प्रोटीनमध्ये झालेले बदल आढळले.अभ्यासाची प्रथम लेखिका वेंडी के जो यांनी सांगितले की कोरोनाव्हायरस इन्फ्लुएंझा सारखे रोग प्रतिकारक शक्तीपासून वाचू शकतात. 
शास्त्रज्ञानीं म्हटले आहे की कोरोनाव्हायरसपेक्षा नोव्हल कोरोनाव्हायरस मध्ये बदलच होण्याचे प्रमाण जास्त आहे. अभ्यासाचे सहलेखक,जेन फ्लिक्स ड्रॅगजलऱ म्हणतात की सॉर्स-कोव्ह-2 च्या आनुवंशिक जीवनात होणाऱ्या वेगाने बदल मुळे जगभरात विषाणूंचे विविध रूप सामोरी येत आहेत. 
ड्रॅगजलऱ म्हणतात, आमचे असे म्हणणे आहेत की कोविड-19 लसीवर साथीच्या रोगाच्या वेळी नियमितपणे लक्ष दिले पाहिजे आणि त्याला आवश्यकतेनुसार अपडेट देखील केले पाहिजे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना स्फोट महाराष्ट्रातील 10 सर्वात बाधित जिल्ह्यांपैकी 8 जिल्ह्यात स्थिती चिंताजनक!