Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गैरसमजांचा व अहंकाराचा कचरा दूर करा

गैरसमजांचा व अहंकाराचा कचरा दूर करा
, गुरूवार, 25 मार्च 2021 (11:32 IST)
सदगुरू कित्ती छान सांगतात
कुटुंबप्रमुख पुरुषाला वाटतं की "मी कमवतोय म्हणुन घरातली माणसं जीवन जगतायेत."
पण खरं तर सद्गुरू सांगतात की "तसं नाहीये. घरातली माणसं जगावीत या देवाच्या इच्छेमुळे तुझी कमाई चालु आहे. त्यांना टाकुन दे मग तुझी कमाईच खाली गडगडेल. अधोगती होत जाईल."
 
घरच्या बाईला देखील वाटतं की "मी कामं करते म्हणून घरातली माणसं जेवतात, धुतलेले कपडे घालतात वगैरे वगैरे."
पण सद्गुरू सांगतात की "त्यांच्यासाठीच तुला शक्ती दिलीय. चांगलं आरोग्य दिलंय. त्यांना टाकशील तर राहिल का आरोग्य जागेवर?"
 
खरंय...
आपल्या घरातल्यांच्या नशीबाची आपल्याला साथ असते म्हणून आपण प्रगती करत असतो, कमवत असतो, कामे करत असतो. हे त्यांचे आपल्यावरच ऋण असते. पण आपण त्यांच्यावरच उपकार केल्यासारखं वागत असतो.
 
म्हणून यापुढे असा विचार करायला लागेल की
"घरातल्या माणसांना मी सांभाळत नाहीये, तर घरातल्या माणसांसाठी सद्गुरूनी मला आत्तापर्यंत सांभाळलंय."
 
सद्गुरूबोधाने गैरसमजांचा व अहंकाराचा कचरा दूर होऊन दृष्टीकोन स्वच्छ होतो.
जय जय रघुवीर समर्थ
 
||रामकृष्णहरि ||

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

यंदाची होळी अशी साजरी करा