अलीकडील काळात देशात कोरोनाविषाणूंच्या नवीन घटनांमध्ये मोठी झेप झाली आहे.यामुळे, नवीन निर्बंधांचा कालावधी देखील सुरू झाला आहे. विमानतळावर मास्क लावणे ,सामाजिक अंतर राखणे सारखे अनेक प्रोटोकॉल चेही अनुसरण केले जात आहे. या दरम्यान डीजीसीए ने एक निवेदन जारी केले असून या मुळे हवाई प्रवाश्यांना मोठा धक्का बसू शकतो.
डीजीसीएने म्हटले आहे की कोरोना नियमांचे उल्लंघन करत विमानतळांवर कोणीही आढळले तर त्यावर त्यात क्षणी दंड आकारण्यात येईल.
डीजीसीएने म्हटले आहे की देशातील अनेक विमानतळांवर कोविड प्रोटोकॉलचे पूर्ण पालन केले जात नाही. डीजीसीएने एअरलाइन्सला विमानतळांवर फेस मास्क घालणे आणि विमानतळांवर सामाजिक अंतर राखणे यासारख्या नियमांचे पालन केले पाहिजे याची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.
“स्पॉट फाईनसह कोरोना प्रोटोकॉलचे पालन न करणाऱ्याच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचेही पर्याय आहेत.गेल्या आठवड्यात डीजीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे की गेल्या आठवड्यात तीन एयरलाईन्समध्ये 15 प्रवासी कोरोनाच्या नियमांना मोडताना आढळले होते. त्याच्या वर तीन आठवडे उड्डाण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
त्याच बरोबर हेसुद्धा यापूर्वी सूचना देण्यात आले होते की ज्या प्रवाश्यांने योग्य प्रकारे मास्क लावले नाही त्यांच्या विरुद्ध नियमांचे उल्लंघन करण्यासाठी कारवाई करून त्यांना उड्डाणातून काढण्यात यावे. डीजीसीए ने विमान कंपन्यांना तीन महिन्यापासून ते दोन वर्षा पर्यंतचे निर्बंध आणण्यास परवानगी दिली आहे.