शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांना कोरोना झाला आहे. विशेष म्हणजे काहीच दिवसापूर्वी आमदार पाटील यांनी कोरोनाची लस घेतली होती. कोरोना झाल्याबाबत आमदार पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. माझी प्रकृती उत्तम आहे, मला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. त्याचप्रमाणे माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करावी आणि प्रत्येकाने आपली आणि आपल्या कुटूंबातील सदस्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.