rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आज गानसम्राज्ञी चा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने.......

happy birthday lata mangeshkar
, मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (20:14 IST)
आंनद घन प्रत्यक्ष आम्ही पहिला,
चिंब पावसात त्याच्या, प्रत्येकजण मोहरला,
कधी मोगरा फुलविला, तर कधी प्राजक्ता चा सडा पडला,
कधी आर्त स्वर होऊन डोळ्यावाटे वाहून गेला,
कधी लावली हुरहूर त्याला भेटायची,
कधी पावती मिलनाच्या तृप्ती ची,
बहीण भावंडा च उत्कट प्रेम दिसलं,
विठू रायाला साक्षात गाण्यातून उभं पाहिलं,
हास्याच्या हिंदोळ्यावर मनसोक्त झुलविलं,
मन फुलांच्या देशातून अलगद भटकून आलं,
कोणता असा क्षण आहे की या दैवी आवाजाची साथ नाही,
कोणताच प्रसंग ह्यांच्या विना पूर्ण नाही,
अंतर्बाह्य व्यापून टाकण म्हणजे काय असतं ते कळलं,
लता दीदी हे करू जाणं फक्त तुम्हांस जमलं!!
अश्विनी थत्ते  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पश्चिम बंगाल मधील एक सुंदर आणि स्वस्त ठिकाण दिघा,जोडप्यांसाठी उत्तम आहे