Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चित्रपट फ्लॉप होण्याच्या भितीने कधीही शूट झाला नाही रजनीकांतच्या मृत्यूचा सीन

चित्रपट फ्लॉप होण्याच्या भितीने कधीही शूट झाला नाही रजनीकांतच्या मृत्यूचा सीन
सुपरस्‍टार रजनीकांत 12 डिसेंबराला 67 वर्षाचे झाले आहे. त्यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बंगलुरूमध्ये झाला होता. त्यांच्या आई वडिलांनी त्यांचे नाव शिवाजी राव गायकवाड ठेवले होते, पण चित्रपटात ते रजनीकांत म्हणूनच प्रसिद्ध झाले. त्यांचे वडील रामोजी राव गायकवाड हवालदार होते. आई जिजाबाईच्या मृत्यूनंतर चार भाऊ बहिणींमध्ये सर्वात लहान रजनीकांत यांना जाणीव झाले की त्यांच्या घारीची परिस्थिती चांगली नाही आहे तर कुटुंबाला सपोर्ट देण्यासाठी ते कूली बनले.  
 
ही बाब फारच प्रेरणा देणारी आहे की कसे बंगलुरू परिवहन सेवा (बीटीएस)चा एक बस कंडक्टर फक्त दक्षिण भारतीय चित्रपटांचा सुपरस्‍टारच बनला बलकी बॉलीवूडसमेत संपूर्ण जगात त्याने आपली एक वेगळी ओळख देखील बनवली.  
 
रजनीकांत यांची भेट एका नाटकादरम्यान फिल्म निर्देशक के. बालाचंदर यांच्याशी झाली होती, ज्यांनी त्यांना तमिळ चित्रपटांमध्ये काम करण्याचे ऑफर दिले होते. या प्रकारे त्यांच्या करियरची सुरुवात बालाचंदर निर्देशित तमिळ चित्रपट 'अपूर्वा रागंगाल' (1975) पासून झाली, ज्यात ते खलनायक बनले होते. ही भूमिका तसी तर लहान होती, पण त्यांच्या कामाची तारीफ झाली होती. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.  
 
खलनायक बनून झाली होती करियरची सुरुवात  
 
रजनी हे तमिळ चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारत हळू हळू स्थापित अभिनेता म्हणून ओळखू लागले. तेलुगू फिल्म 'छिलाकाम्मा चेप्पिनडी' (1975)मध्ये त्यांनी पहिल्यांदा हीरोचा रोल साकारला आणि त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून बघितले नाही. त्यानंतर बघता बघता रजनीकांत यांनी तमिळ सिनेमावर आपली छाप सोडली.  
 
रजनीकांत यांच्याबद्दल पाच प्रमुख गोष्टी  
 
1- तमिळ चित्रपटांचे सुपर स्‍टार रजनीकांत यांनी हिंदी, कन्नड, मलायलम, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये काम केले आहे, पण त्यांनी कधीही मराठी चित्रपटांमध्ये काम केले नाही, जेव्हाकी रजनीकांत मूलरूपचे मराठी भाषी आहे.  
 
2-रजनीकांत यांचे फेवरेट ऍक्टर कमल हासन आहे. त्यांच्यासोबत देखील रजनीने बरेच चित्रपट केले आहे. त्यांची फेवरेट एक्‍ट्रेस हेमा मालिनी आणि रेखा आहे.
 
3-शिवाजीच्या यशानंतर रजनीकांत यांनी आपली फीस 26 कोटी रुपये केली होती. त्याचबरोबर ते जॅकी चैननंतर सर्वात महागडे  नायक झाले आहे.  
 
4-रजनीकांताने मागील काही वर्षांपासून स्क्रीनवर मरण्याचे दृश्य दिले नाही. डायरेक्टर्सना असे वाटते की जर त्यांनी रजनीला मरताना दाखवले तर चित्रपट नक्कीच फ्लाप होईल.  
 
5-रजनीकांत यांनी बॉलीवूडच्या बर्‍याच सुपर स्टार्ससोबत काम केले, पण सर्वात जास्त चित्रपट त्यांनी राकेश रोशनसोबत केले,  पण राकेशच्या निदर्शनात बनलेल्या एकाही चित्रपटात त्यांनी काम केले नाही.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कवी गुरु ठाकूर यांनी प्रथमच केले 'जराशी जराशी' गाण्याचे लाँच