Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जस्सी गिलचे नवे गाणे, अवघ्या काही तासात लाखो हिट्स

Jassi Gill
, सोमवार, 11 डिसेंबर 2017 (08:41 IST)

जस्सी गिल  या नावाने पंजाबी गायक आणि अभिनेता जसदीप सिंह गिल पुन्हा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. जस्सीच्या नव्या गाण्याचे बोल  'गिटार सिखदा' असे आहे.  रविवारी या गाण्याला रिलीज करण्यात आलं. अवघ्या काही तासात या गाण्याला 5 लाखाहून अधिक लोकांनी पाहिलं आहेया गाण्याचे बोल आणि म्युझिक दोन्ही खूपचं गोड आहे.  आपल्या प्रेमाला पुन्हा साद घालणारं हे गाणं काळजाचा ठाव घेणारं आहे. प्रेमाला पुन्हा मिळवण्यासाठी तो गिटार शिकत आहे. 

'गिटार सिखदा' हे पंजाबी रोमॅन्टिक गाणं आहे. या गाण्याला बी.प्राकने संगीत दिलं आहे. जानी ने या गाण्याचे शब्द लिहले आहेत. 'टाईम्स म्युझिक एन्ड स्पीड रेकॉर्ड्सद्वारा हे गाणं बनवण्यात आलं आहे. २०११ साली जस्सीचा पहिला अल्बम बॅचमेट आला होता. त्यानंतर यार जट दे , बॉर्नविटा ही गाणी रसिकांच्या भेटीला आली. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

करीना कपूर का गेली नाही शशि कपूरच्या प्रार्थना सभेत?