Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Happy Teacher's Day: हॅपी टीचर्स डे' चित्रपट शिक्षकांच्या गमावलेल्या प्रतिष्ठेवर प्रश्न उपस्थित करणारा चित्रपट

Happy Teacher's Day: हॅपी टीचर्स डे' चित्रपट शिक्षकांच्या गमावलेल्या प्रतिष्ठेवर प्रश्न उपस्थित करणारा चित्रपट
, सोमवार, 5 सप्टेंबर 2022 (21:07 IST)
शिक्षक दिनानिमित्त, निर्माता दिनेश विजन यांनी त्यांच्या पुढील निर्मिती उपक्रम "हॅपी टीचर्स डे" ची घोषणा केली आहे. ‘बदलापूर’, ‘स्त्री’, ‘हिंदी मीडियम’ यांसारखे चित्रपट बनवल्यानंतर दिनेश विजन आता ‘हॅपी टीचर्स डे’ हा सोशल थ्रिलर चित्रपट बनवणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट पुढच्या वर्षी 5 सप्टेंबर2023 ला मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. या चित्रपटात आंग्रेजी मीडियम अभिनेत्री राधिका मदान आणि निम्रत कौर मुख्य भूमिकेत असणार आहेत.
 
निर्मात्यांनी चित्रपटाची घोषणा करणारा व्हिडिओ देखील जारी केला आहे. व्हिडिओची सुरुवात शाळेच्या बेलने होते. हळुहळू कॅमेरा वर्गाच्या आत जातो आणि तिथे एक शिक्षक शिकवतो, ज्ञान देतो, सशक्त करतो असे लिहिले आहे. म्हणजे तुमचे जीवन. पण तो आयुष्य जगू शकत नाही का? यानंतर काही मेसेजचे स्क्रीनशॉट्स येतात. ज्यामध्ये शिक्षकांची टिंगल टवाळणी उडवली जात आहे. घोषणेचा व्हिडिओ पाहता, हा चित्रपट शिक्षकांच्या विनोदांवर आणि अश्लील कमेंटवर आधारित असल्याचे दिसते. मात्र, चित्रपटाच्या कथानकाशी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. 
 
राधिका मदान आणि निम्रत कौर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 'हॅपी टीचर्स डे' या चित्रपटाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत राधिकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, "सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा! आणि आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत! दिनेश विजन 'हॅपी टीचर्स डे' सादर करत आहेत, या चित्रपटात  अभिनेत्री निमरत कौर मुख्य भूमिकेत आहे.
 
 हा चित्रपट शिक्षक दिन 2023 ला प्रदर्शित होईल. आज शूटिंग सुरू होत आहे! #HappyTeachersDayFilm(sic)".
हॅपी टीचर्स डे या चित्रपटाचे दिग्दर्शन मिखिल मुसळे करणार आहेत. राधिका मदन आणि निम्रत कौर अभिनीत हा चित्रपट मॅडॉक फिल्म्स अंतर्गत दिनेश विजन निर्मित आहे. या सोशल थ्रिलर चित्रपटाची कथा मिखिल मुसळे आणि परिंदा जोशी यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे चित्रीकरण आज 5 सप्टेंबर रोजी  सुरू होत आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Marathi Joke : मुलगी आणि भंडारा