कोरोनासारख्या अनेक आजारांपासून स्वत: ला वाचवण्यासाठी लोकांनी घरी हवन केलं पाहिजे, असं वक्तव्य भाजप खासदार हेमा मालिनी यांनी केलं आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हेमा मालिनी यांनी एक व्हीडिओ शेअर केला होता.
त्या म्हणाल्या, "मी अनेक वर्षांपासून पूजा झाल्यानंतर हवन करते आणि कोरोनाचा संसर्ग आल्यापासून मी दिवसातून दोनदा हवन करते. यामुळे वातावरण फक्त शुद्ध होतं नाही तर पवित्र वाटतं आणि कोरोनासारख्या संसर्गाला आपल्यापासून दूर ठेवतं.
"आज संपूर्ण जग कोरोनासारख्या भयानक संसर्गाचा सामना करत आहे. मी सगळ्यांना विनंती करते की फक्त जागतिक पर्यावरणा दिनानिमित्त नाही तर जोपर्यंत आपण कोरोना संसर्गावर मात करत नाही तो पर्यंत रोज हवन करा. याच्याशी कोणत्याही धर्म किंवा जातीचा संबंध नाही," असं त्यांनी पुढे म्हटलं आहे.