Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

World Poha Day 2021 विश्व पोहा दिवस च्या निमित्ताने विविध प्रकरांची रेसिपी खास आपल्यासाठी

World Poha Day 2021 विश्व पोहा दिवस च्या निमित्ताने विविध प्रकरांची रेसिपी खास आपल्यासाठी
, सोमवार, 7 जून 2021 (11:52 IST)
2015 सालपासून 7 जून हा दिवस पोहा दिन किंवा विश्व पोहा दिवस  म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली. पोहा अनेक लोकांच्या अगदी आवडीच्या पदार्थांमध्ये सामील रेसिपी आहे. पोहा तयार करण्याचे विविध प्रकार आहेत. तर आज येथे जाणून घ्या महाराष्ट्र पद्तीचे कांदे पोहे, इंदूरचे प्रसिद्ध पोहे आणि दडपे पोहे रेसिपीबद्दल....
 
इंदूरी पोहा Indori Poha Recipe
सामुग्री- 2 कप पोहा, 1-2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा मोहर्‍या, 1/4 चमचा हळद, 2 चमचे तेल, 2-3 चमचे साखर, मीठ स्वादप्रमाणे, हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली.
 
इतर सामुग्री: 1/2 कप बारीक चिरलेला कांदा, इंदुरी शेव, जिरावण, लिंबू.
 
कृती: सर्वात आधी पोहे स्वच्छ धुऊन घ्यावे. हळुवार पाणी काढून घ्यावे. आणि तसेच राहू द्यावे. त्यात हळद, साखर  आणि मीठ मिसळावे. नंतर कढईत तेल गरम करुन मोहर्‍या, मिरची आणि बडीशेप घालून फोडणी तयार करावी. आता यात पोहे मिसळून द्यावे. पाणी उकळून ठेवलेल्या  एका मोठ्या भांड्यावर कढई ठेवून त्याला वाफ येऊ द्यावी. आपण गॅसवर थेट कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर वाफ देखील घेऊ शकतात.
 
पोहे चांगले वाफल्यावर गॅस बंद करावा. सर्व्ह करताना वरुन कोथिंबीर, कच्चा कांदा, लिंबू आणि जिरावण पावडर टाकावी.
 
********************************************* 
कांदा पोहा Kanda Poha Recipe
सामुग्री- 2 कप पोहा, 1 मध्यम कांदा, फोडणीसाठी : मोहोरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता पाने, 4 हिरव्या मिरच्या, 4 चमचे तेल, चवीपुरते मीठ, 1 चमचा साखर, लिंबू, चिरलेली कोथिंबीर, खवलेला नारळ
 
कृती: पोहे भिजून घ्यावे. नंतर पाणी निथळून गेले कि त्याला मिठ आणि साखर घालावी. कढईत तेल गरम करुन मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता, मिरची घालून मग चिरलेला कांदा घालावा. ज्यांना शेंगदाणे आवडतं असतील ते फोडणी करताना कांदा शिजत आला कि थोडे शेंगदाणे घालून परतावे. कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यावर त्यात पोहे घालावे. नीट हालवून घ्यावे. मध्यम आचेवर वाफ काढावी. सर्व्ह करताना पोह्यांवर लिंबू पिळावे आणि वरून चिरलेली कोथिंबीर व खवलेला नारळ घालावा.
********************************************* 
दडपे पोहे - Dadpe Pohe Reicpe
सामुग्री- 2 वाटी पातळ पोहे, 1 मध्यम कांदा, 2 चमचे तेल, फोडणीसाठी: मोहोरी, हिंग, हळद, 1 चमचा मिरची किंवा मिरचीचे लोणचे, 2 मोठे चमचे खवलेला ओला नारळ, कोथिंबीर, मीठ, लिंबू
 
कृती: पोहे पातेल्यात हलके भाजून घ्यावे. कढईत तेल गरम करुन फोडणीचे साहित्य घालावे. भाजलेले पोहे त्यात घालून परातावे. लगेच कांदा, ओला नारळ, मिरची, मीठ, चवीपुरती साखर, लिंबू घालावे आणि चांगले चुरून घ्यावे. आपण आवडीप्रमाणे लाल तिखट घालू शकता. सर्व एकत्र करून 5-7 मिनीटे पोहे दडपून ठेवावेत. मग सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Tata Memorial Centre Recruitment 2021 मुंबई येथे नोकरीसाठी अर्ज करा