Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चविष्ट पोहे पनीर रेसिपी

चविष्ट पोहे पनीर रेसिपी
, बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (22:49 IST)
साहित्य- 
200 ग्रॅम पोहे, 1 चमचा तेल, 170 ग्रॅम पनीर, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 1 चमचा हिरव्या मिरच्या, 6 -7 कडी पत्ते, 1 चमचा काजू, 1 कांदा, 1 चमचा मीठ,1/4 चमचा हळद,1 चमचा साखर, 2 चमचे लिंबाचा रस, कोथिंबीर, पाणी.
 
कृती 
     
एका भांड्यात पोहे घालून भिजत ठेवा. एका पॅन मध्ये तेल घालून गरम करा त्या मध्ये पनीर घालून 8 -10 मिनिटे सोनेरी रंग येई पर्यंत परतून घ्या. हे काढून ठेवा. कढईत तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे हिरव्या मिरच्या कडीपत्ता, पनीर ,काजू घालून परतून घ्या. आता कांदा घालून सोनेरी रंग येई पर्यंत परतून घ्या.मीठ, हळद घाला आता धुतलेले पोहे घालून मिसळा साखर,लिंबाचा रस कोथिंबीर घालून मध्यम आचेवर शिजवा आणि एक वाफ देऊन काढून घ्या.गरम पनीर पोहे खाण्यासाठी तयार.     
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चंदन फेस पॅक: चेहऱ्यावर चमक देतो चंदन फेस पॅक आवर्जून वापरावे