Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आरोग्यवर्धक आणि चविष्ट हरभराडाळीच्या पिठाचे पराठे

आरोग्यवर्धक आणि चविष्ट हरभराडाळीच्या पिठाचे पराठे
, रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (12:59 IST)
सकाळच्या न्याहारीसाठी आवश्यक आहे की पोषक घटकाने समृद्ध असलेले खावे. परंतु आरोग्यासह चव देखील महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत हरभराडाळीच्या पिठाचा पराठा बनवा हे आरोग्यासाठी फायदेशीर तर आहेच परंतु चव देखील उत्कृष्ट आहे. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.  
 
साहित्य- 
 1 कप गव्हाचं पीठ, 1/2 कप हरभराडाळीचे पीठ, 1/2 चमचा हळद, 1 चमचा तिखट, मीठ चवीप्रमाणे,1 चमचा कसुरी मेथी, 1/2 चमचा ओवा,1/2 चमचा जिरे,हिंग,गरममसालापूड,तेल गरजेनुसार.  
 
कृती -
सर्वप्रथम एका भांड्यात हरभराडाळीचे पीठ,हिंग,गरम मसाला, तिखट,हळद सर्व जिन्नस एकत्र करा. चवीप्रमाणे मीठ आणि तेल घालून मिसळा. आता गव्हाच्या पिठात लागत लागत पाणी घालून पोळ्यांसाठी मळतो तशी कणीक मळून घ्या. या कणकेच्या लाट्या किंवा लहान लहान गोळे बनवून लाटून घ्या. त्या लाटलेल्या पोळी मध्ये हरभरा डाळीचे तयार केलेले मिश्रण भरा आणि सगळी कडून बंद करून लाटून घ्या.  
तयार पोळी गरम तव्यावर घालून थोडं तेल सोडून दोन्ही कडून सोनेरी रंग येई पर्यंत शेकून घ्या. गरम हरभराडाळीचे पराठे खाण्यासाठी तयार हे पराठे दह्यासह किंवा चटणीसह सर्व्ह करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Diwali Special Faraal Gulache Shankar Pale Recipe : गुळाचे चविष्ट शंकरपाळे