जेव्हा जेव्हा त्वचेला सुंदर आणि चमकदार बनवायची गोष्ट येते तेव्हा या साठी चंदन पावडर चे नाव आवर्जून घेतले जाते. ह्याचा वापर प्राचीन काळापासून बऱ्याच उपचारांवर केला जात आहे. ह्याच्या वापर केल्याने आपण सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवू शकता. हे आपल्या त्वचेला मऊ बनविण्या सह त्वचेवरील डाग दूर करण्यात मदत करते. चला तर मग जाणून घेऊ या की चंदनाचे फेस मास्क कसे बनवायचे जे आपल्या त्वचेला चमक देते.
त्वचेवरील मुरुमांमुळे त्रस्त आहात तर या समस्येचे समाधान म्हणजे चंदन पावडरची पेस्ट. या साठी चंदन पावडर आणि गुलाब पाणी सम प्रमाणात एकत्र करा. हे संपूर्ण चेहऱ्यावर लावून किमान 15 मिनिटे तसेच ठेवा. हे त्वचेला थंडावा देतो आणि असलेले मुरूम देखील नाहीसे करतो.
अँटीएजिंग साठी फायदेशीर आहे -हे बनविण्यासाठी अंडी फोडून पिवळे भाग घ्यावयाचे आहे. या मध्ये अर्धा चमचा मध आणि 1 चमचा चंदन पावडर मिसळा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावून तसेच ठेवा. सुकल्यावर धुवून घ्या. या मुळे चेहऱ्याची त्वचा घट्ट होते आणि त्यावर सुरकुत्या येत नाही.
कच्च दुधात अर्धा चमचा चंदन पावडर मिसळा. हे आपल्या पूर्ण चेहऱ्यावर लावून घ्या 15 मिनिटे तसेच ठेवा. सुकल्यावर हाताने चोळून चोळून सोडवा. हे त्वचेवरील टॅनिग कमी करण्यात फायदेशीर आहे.
चेहऱ्यावर सतत घाम येत असल्यास चंदनाचे फेस पॅक लावा. या मुळे थंडावा जाणवतो या साठी चंदन पावडर मध्ये गुलाबपाणी आणि कच्च दूध मिसळा. हे पॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि काही वेळा नंतर चेहरा धुवून घ्या.