एकदा एका शहरात एक मोठ्या झाडावर एक पक्षी राहता होता, त्याचे नाव सिंधुक होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी की त्या पक्षीची विष्ठा सोन्यात बदलून जायची .ही गोष्ट कोणालाही माहिती नसे. एकदा एक शिकारी त्या झाडा खालून निघत होता. त्याने विसावा घेण्यासाठी थांबला तो झोपलाच होता की तेवढ्यात सिंधुकने विष्ठा केली आणि ती त्या शिकारीचा जवळ पडली बघता तर काय ती विष्ठा सोन्याची बनली. शिकारी खुश झाला आणि त्याने त्या पक्ष्याला पकडण्यासाठी सापळा रचला.
सिंधुक त्या सापळ्यात अडकला. शिकारी त्याला घेऊन घरी आला. शिकारी विचार करू लागला की जर ह्या बाबतीत राजाला कळाले तर ते सिंधुक ला दरबारात आणण्यासाठी म्हणतील आणि मला शिक्षा देतील. असा विचार करून तो स्वतःच सिंधुक ला घेऊन राजाच्या दरबारात गेला आणि घडलेले सर्व सांगितले. राजाने त्याला सिंधुकची काळजी घेण्यास आणि व्यवस्थित सांभाळ करण्यास सांगितले.
हे ऐकल्यावर मंत्रीने राजा ला म्हटले की , महाराज या मूर्ख शिकारीच्या सांगण्यात काहीच तथ्य नाही हे कसे काय शक्य आहे.की एखाद्या प्राण्याची विष्ठा सोन्याची बनेल. आपण ह्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका या पेक्षा त्या पक्षीला मुक्त करण्यास सांगा.
मंत्रींच्या सांगण्यावरून राजाने पक्ष्याला स्वतंत्र करण्याचे आदेश दिले सिंधुक उडत उडता राजाच्या दारावर विष्ठा करून गेला .बघता तर काय खरंच विष्ठा सोन्यात बदलली होती. हे बघून राजाने सैनिकांना त्या पक्ष्याला पकडण्यास सांगितले पण तो पर्यंत सिंधुक फार लांब गेला होता. जाताना सिंधुक म्हणून गेला" मी मूर्ख होतो ज्याने त्या शिकारी समोर विष्ठा केली , शिकारी मूर्ख होता ज्याने मला राजाकडे आणले आणि राजा देखील मूर्ख आहे ज्याने मंत्रींच्या सांगण्यावरून मला मुक्त केले. सगळे मूर्ख एकाच ठिकाणी आहे. "
तात्पर्य- कधीही दुसऱ्यांच्या सांगण्यात येऊ नये. नेहमी आपल्या डोक्याने काम करावे.