बादशहा बिरबल बऱ्याच वेळा आपल्या अनेक समस्यांवर बिरबलाशी चर्चा करायचे आणि त्यांच्या बुद्धिमत्तेची चाचणी करायचे. बिरबल देखील त्यांच्या प्रत्येक समस्यांचे समाधान द्यायचे.
एकदा बादशहा अकबर आणि बिरबल हे बागेत फिरत असताना गंभीर चर्चा करत होते तेवढ्यात बादशहाला बिरबलाची परीक्षा घेण्याचा विचार आला. एकाएकी बादशहाचे लक्ष एका लाकडाकडे गेले आणि त्यांनी बिरबलाला विचारले, " बिरबल हे सांगा की समोर पडलेले लाकूड, न कापता लहान करू शकतोस? ते लाकूड बिरबलाच्या हातात देऊन म्हणाले, " होय बादशहा मी हे लाकूड लहान करू शकतो. "
कास काय? अकबर म्हणाले ! तेव्हा बिरबलाने त्या ठिकाणी पडलेले एक लाकूड उचलले आणि बादशहाला विचारले की " महाराज या पैकी कोणते लाकूड लहान आहे?
बादशहा अकबर बिरबलाच्या बुद्धिमतेला समजून गेले आणि म्हणाले की खरंच बिरबल आपण हे लाकूड न कापता लहान केले. आणि त्यांनी बिरबलाचे खूप कौतुक केले.
तात्पर्य- परिस्थिती कशीही असली तरी ही डोकं वापरून त्यामधून बाहेर निघण्याचा मार्ग शोधावा.