Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खरे मित्र

खरे मित्र
, शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (08:00 IST)
एक राधा नावाची मुलगी आपल्या वडिलांसह राहायची. तिची आई ती लहान असतानाच वारली .ती घरातील सर्व कामे करून शाळेत कॉलेजात जायची.कालेज जाताना ती वाटेत एका जागी पाखरांना खायला दाणे द्यायची.
तिच्या घरात देखील दोन पाखरे होती. ती त्यांना दररोज दाणे  द्यायची. एके दिवशी तिला पाखरांना दाणे घालताना एका जमीदाराच्या मुलाने बघितले. त्या मुलाने घरी जाऊन आपल्या वडिलांना मला राधाशी लग्न करावयाचे आहे असे सांगितले. 
जमीदाराने राधाच्या वडिलांशी बोलणी करून त्यांचे लग्न लावून दिले.राधाने आपल्यासह ते दोन पाखरे देखील सासरी आणली.
ती दररोज त्या पाखरांना दाणे घालायची .हे तिच्या सासूला आवडत नसे. 
तिची सासू त्या पाखरांना त्रास द्यायची. त्यांचे खाणे जमिनीवर फेकायची पाणी सांडून द्यायची .सासूला असं करताना राधाने बघितले. हे तिला अजिबात आवडले नाही तिने सासूला असं करू नका म्हणून सांगितले. त्यावर तिच्या सासूने तिलाच रागावले. या गोष्टींना बघता राधा खूप काळजीत राहू लागली. एके दिवशी तिच्या नवऱ्याने तिला काळजी करण्याचे कारण विचारले. त्यावर तिने घडलेले सर्व सांगितले. तिच्या नवऱ्याने तिला ह्याच्या वर उपाय म्हणून त्या पाखरांना बागेत मोकळ्या हवेत सोडायला सांगितले. राधाने तसेच केले. ती बागेत जाऊन त्यांना दाणे खायला द्यायची. आता पाखरं राधाचे चांगलें मित्र झाले होतो. ते पाखरे राधा च्या घरात देखील येऊ लागले.राधाच्या सासूला हे कळतातच ती फार रागावली आणि राधाला तिच्या घरी सोडायला गेली.   
 
वाटेतून जाताना काही दरोडेखोरांनी राधाच्या सासूचे दागिने लुटण्याचे प्रयत्न करत असताना राधाच्या सर्व  पाखरे मित्रांनी दरोडेखोरांवर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याला बघून दरोडेखोरांनी पळ काढला. त्यानंतर राधाची सासू आणि राधा घरी परत आले. 
आता राधाच्या सासूची मते पाखरांसाठी बदलली होती. तिने राधाला म्हटले की आता उद्या पासून आपण दोघी पाखरांना दाणे देण्यासाठी जाऊ आणि तुझ्या त्या दोन पाखरांना देखील घरी घेऊन येऊ.हे ऐकून राधा खूप आनंदी झाली. 
 
तात्पर्य - नेहमी मुक्या प्राण्यांशी चांगला व्यवहार करावा.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काही सोप्या कूकिंग टिप्स आणि ट्रिक्स -