Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सर्वात मौल्यवान वस्तू

सर्वात मौल्यवान वस्तू
, शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (09:00 IST)
एकदा राजा कृष्णदेव राय एका राज्याला जिंकून आपल्या नगरात परतले. त्यांनी मिळवलेल्या विजयामुळे संपूर्ण नगर आनंदात होते. नगर पूर्ण सजविले गेले. प्रजेनं आपल्या लाडक्या राजाचे स्वागत केले. 
 
राजा कृष्णदेव राय ह्यांनी दुसऱ्या दिवशी राज्य सभेत सांगितले की हा  विजय मिळवणे माझ्यासाठी खूप खास आहे. या साठी  आम्हाला काही असे करावयाचे आहे जे कायमचे लक्षात राहील. एका मंत्र्याने राजा ला सल्ला दिला की आपण एक विजय स्तंभ बनवून घ्या.जो नेहमी आपली विजय गाथा सांगेल. राजाला हा सल्ला आवडला.
 
दुसऱ्या दिवशी त्यांनी राज मिस्त्री ला बोलविले आणि त्याला सांगितले की लवकरात लवकर विजय स्तंभ तयार करा. विजय स्तंभावर काम सुरू झाले लवकरच ते तयार झाले आता त्या वर नाकाशी चे काम राहिले होते. त्यावर कोरीव काम करायला सुरुवात झाली 
 
मिस्त्री ने दिवसरात्र एक करून काहीच दिवसात विजयस्तंभ उभारले.
एका खास दिवशी राजाने त्या विजय स्तंभाचे उद्घाटन केले.  त्या विजय स्तंभाला बघून सर्व आनंदित झाले. राजा ने राज मिस्त्रीला बोलवून म्हटले की तुम्ही काम खूपच छान केले आहे आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहोत. आम्ही तुम्हाला काही बक्षिसे देऊ इच्छितो. सांगा आपल्याला काय पाहिजे . राज मिस्त्रीने नकार देऊन म्हणाला की महाराज आपल्या कृपेने माझ्याकडे सगळे काही आहे. मला काहीच नको. 
 
परंतु राजाच्या वारंवार म्हणण्यावरून त्याने राजाला सांगितले की महाराज मला आपण काही असं द्या की जे खूपच मौल्यवान असावं आणि त्याचे  मूल्य कधीच देता येणार नाही. असं म्हणत त्याने एक पिशवी त्यांच्या पुढे केली .
राजा विचारात पडले की अशी कोणती वस्तू आहे. ज्याचे मूल्य देता येणार नाही.
दुसऱ्या दिवशी त्यांनी राज मिस्त्रीला बोलावले.आणि तसेच सैनिकांना तेनालीरामला देखील बोलवायला सांगितले. सैनिक तेनालीरामकडे गेले आणि त्यांना घडलेले सर्व सांगितले 
तेनाली दरबारात राज मिस्त्रीसह उपस्थित झाले आणि राजाने तेनालीला घडलेले सांगितले तेव्हा तेनाली म्हणाले की महाराज मला हे माहीत होते म्हणून मी माझ्या बरोबर ती मौल्यवान वस्तू घेऊन आलो आहोत. तेनालीने मिस्त्रींची ती पिशवी घेतली तिला उघडली आणि नंतर परत बंद करून मिस्त्रीला परत दिली मिस्त्री ती पिशवी घेऊन आपल्या घरी निघून गेला.
 
राजाने तेनालीरामला विचारले की आपण मिस्त्रीला रिकामी पिशवी दिली आणि तो ती घेऊन गेला देखील . तेनाली म्हणाले महाराज मी त्या मिस्त्रीला रिकामी पिशवी दिली नाही मी त्याला त्यामध्ये हवा भरून दिली. जी या जगात सर्वात मौल्यवान आहे. त्याचे कोणी  काहीही मूल्य लावू शकत नाही. राज मिस्त्री ला देखील हे समजले म्हणून तो पिशवी घेऊन निघून गेला. राजाने तेनालीच्या बुद्धिमत्तेचे खूप कौतुक केले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय सांगता, शॅम्पू मध्ये हे मिसळल्याने केसांची गळती थांबते