Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

राजाची आज्ञा

marathi kids stories kids zone
, शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (22:55 IST)
खूप जुनी गोष्ट आहे. चंदनपूर नावाच्या राज्यात राजा तेजप्रताप ह्याचे राज्य होते. ते खूप दयाळू आणि परोपकारी राजा होते.ते आपल्या प्रजेवर खूप प्रेम करत होते. त्यांच्या राज्यात त्यांची प्रजा देखील खूप खुश होती. सर्व लोक संपन्न होते. कोणालाही कसली कमतरता नव्हती. सर्व आपसात  हिळुन मिसळून राहत होते. 
 
एकदा राजा जंगलात गेले असताना तिथे त्यांनी विविध प्रकारचे प्राणी बघितले. सिंह, बिबट्या,अस्वल,हरीण आणि ससा हे सर्व दिसायला खूपच सुंदर होते. राजा ने विचार केला की माझ्या राज्यात लोकांनी हे प्राणी बघितले तर त्यांना खूप आनंद होईल. म्हणून त्यांनी त्या प्राण्यांना म्हटले की ते चंदनपुरात यावे. तिथे त्यांच्या कडे व्यवस्थित लक्ष दिले जाईल आणि त्यांची विशेष काळजी घेतली जाईल. 
त्या प्राण्यांपैकी हरीण आणि ससा भीतीमुळे आले नाही पण सिंह,बिबट्या आणि अस्वल हे राजा बरोबर आले. लोकं त्यांना बघून आनंदित झाले. मुलं देखील त्यांना बघून आनंदित झाले पण त्यांना भीती वाटत होती. 
 
रात्री लोक झोपल्यावर सिंह, अस्वल आणि बिबट्या कोणाच्या शेळ्या तर कोणाची म्हशी आणि कोणाची गाय खाऊन टाकायचे, पण लोकांना हे कळल्यावर त्यांनी राजाला सांगितले की त्यांनी आमचे जनावरे खाऊन टाकली त्यावर राजा म्हणाले की जे प्राणी एकत्र राहत नाही दुसऱ्यांना त्रास देतात. त्यांना इथे राहण्याचा काही अधिकार नाही. राजा ने आपल्या सैनिकांना आज्ञा दिली की त्यांनी सिंह, बिबट्या आणि अस्वलाला जंगलात सोडून यावं. सैनिकांनी त्यांना बळजबरीने मारून तिथून हाकलवून दिले. जे नेहमी दुसऱ्यांना त्रास देतात त्यांना आपल्या बरोबर कोणीच ठेवत नाही   
तेव्हा पासून सिंह,अस्वल आणि बिबट्या जंगलात राहू लागले आणि त्यांच्या गेल्यावर चंदनपुराचे लोक पुन्हा आनंदी राहू लागले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वजन कमी करण्यासाठी दररोज हे योगासन करा