Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात पण 'सुपर ३०' टॅक्स फ्री घोषित

राज्यात पण 'सुपर ३०' टॅक्स फ्री घोषित
, गुरूवार, 1 ऑगस्ट 2019 (08:37 IST)
बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनचा 'सुपर ३०' हा चित्रपट ५ प्रमुख राज्यांमध्ये टॅक्स फ्री घोषित करण्यात आला आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, दिल्ली आणि गुजरात या पाच राज्यांचा समावेश आहे. आता महाराष्ट्राचाही समावेश झाला आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळाने या चित्रपटाला स्टेट जीएसटी चार्जेसमधून सूट मिळवून देण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता 'सुपर ३०' हा चित्रपटाच्या तिकिटावर जीएसटी लागणार नाही. 
 
'सुपर ३०' या चित्रपटाने आतापर्यत १३० कोटी रूपयांची कमाई केली आहे. जर हा चित्रपट अशाच चालला तर लवकरच हा आकडा २०० कोटींवर पोहोचेल, असे चित्रपट समीक्षकांनी अंदाज व्यक्त केला आहे.
 
चित्रपट 'सुपर ३०' मध्‍ये ऋतिक रोशनसोबत म्रृणाल ठाकुर, नंदिश सिंह, रित्विक साहोरे, पंकज त्रिपाठी, अमित साध, विरेंद्र सक्सेना आणि जॉनी लिवर यासारखे कलाकार यांच्यादेखील भूमिका आहेत. हा चित्रपट पटणाचे 'सुपर 30' कोचिंग क्‍लासेसचे संस्थापक आनंद कुमार यांच्‍या आयुष्यावर आधारित आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनातील भावनांना व्यक्त करणारे 'एकदा पाऊस माझ्या घरी' हे गाणे प्रदर्शित