Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभिनेता इरफान खानचं निधन

अभिनेता इरफान खानचं निधन
, बुधवार, 29 एप्रिल 2020 (12:48 IST)
बॉलीवूड अभिनेता इरफान खानचे बुधवारी मुंबईत निधन झाले. कोलन संसर्गामुळे त्याला मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. 
 
54 व्या वर्षाच्या वयात इरफानने जगाचा निरोप घेतला. कॅन्सरवर मात केल्यानंतर तो लंडनहून भारतात परतला होता. इरफान खानने मार्च 2018 मध्ये कॅन्सर झाल्याचं जाहीर केले होते नंतर त्याने सर्व कामं थांबवली आणि उपचारासाठी लंडनला निघून गेला होता. 2019 मध्ये परतल्यानंतर त्याने अंग्रेजी मीडियम या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. 
 
लॉकडाउनमुळे 6 एप्रिल रोजी डिजीटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्यात आला. ‘अंग्रेजी मीडियम’ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला. या व्यतिरिक्त त्याने ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’, बिल्लू बार्बर यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या होत्या. 
 
इरफानने 50 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी 2011 मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता. 
 
तीन दिवसांपूर्वी त्याची आई सईदा बेगम यांचं निधन झालं. लॉकडाउनमुळे इरफान आईला शेवटचं पाहायलाही जाऊ शकला नाही. आईचं अंत्यदर्शनही त्याला व्हिडिओ कॉलद्वारे घ्यावं लागलं होतं. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अभिनेता इरफान खान आयसीयूमध्ये दाखल