Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फिल्मफेअर अ‍ॅवॉर्डस् 2018 : इरफान खान, विद्या बालन सर्वोत्कृष्ट

फिल्मफेअर अ‍ॅवॉर्डस् 2018 : इरफान खान, विद्या बालन सर्वोत्कृष्ट
, सोमवार, 22 जानेवारी 2018 (08:53 IST)
63 व्या जिओ फिल्मफेअर अ‍ॅवॉर्डस् 2018 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून इरफान खान आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून विद्या बालन यांनी बाजी मारली. तर माला सिंन्हा, बप्पी लहरी यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला. फिल्मफेअरच्या या रंगारंग सोहळ्याचे सूत्रसंचालन किंग खान शाहरूख आणि फिल्ममेकर करण जोहर यांनी केले. 
 

‘हिंदी मीडियम’ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला, तर याच चित्रपटातील भूमिकेसाठी इरफान खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. अश्‍विनी अय्यरला ‘बरेली की बर्फी’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सन्मान मिळाला.

‘तुम्हारी सुलू’ चित्रपटात साध्यासुध्या गृहिणीची आर.जे. झालेल्या सुलोचनाची व्यक्‍तिरेखा साकारणार्‍या विद्या बालनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर मिळाला. विद्याचा हा कारकिर्दीतला सहावा फिल्मफेअर आहे.  विशेष म्हणजे, हरहुन्‍नरी अभिनेता राजकुमार रावनेही या सोहळ्यात तब्बल दोन फिल्मफेअर पटकावले. पुरस्कार व विजेते सर्वोत्कृष्ट चित्रपट : हिंदी मीडियम, सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स) : न्यूटन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : विद्या बालन (तुम्हारी सुलू), सर्वोत्कृष्ट अभिनेता : इरफान खान (हिंदी मीडियम), सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) : राजकुमार राव (ट्रॅप्ड), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स) : झायरा वसिम (सिक्रेट सुपरस्टार), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : अश्‍विनी अय्यर तिवारी (बरेली की बर्फी), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण) : कोंकणा सेन शर्मा (अ डेथ इन द गुंज), सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : राजकुमार राव (बरेली की बर्फी), सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री : मेहेर वीज (सिक्रेट सुपरस्टार), सर्वोत्कृष्ट संवाद : हितेश केवल्य (शुभमंगल सावधान), सर्वोत्कृष्ट पटकथा : शुभाशिष भुतियानी (मुक्‍ती भवन), सर्वोत्कृष्ट मूळ कथा : अमित न्यूटन (न्यूटन), सर्वोत्कृष्ट पार्श्‍वगायक : अरिजित सिंग (रोके ना रुके नैना-बद्रीनाथ की दुल्हँनिया), सर्वोत्कृष्ट पार्श्‍वगायिका : मेघना मिश्रा (नचडी फिरा-सिक्रेट सुपरस्टार), सर्वोत्कृष्ट गीतकार : अमिताभ भट्टाचार्य (उल्लू का पठ्ठा-जग्गसूस, सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन : विजय गांगुली आणि रुएल दौसन वरिंदानी (गलती से मिस्टेक-जग्गा जासूस).


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वयात येणार्‍या मुलांसाठी ...