कंगना राणावत हिचा सिमरन नावाचा सिनेमा अलीकडेच रिलीज झाला आहे. सिमरन म्हणजेच कंगनाने यात खूपच शानदार अभिनय केले असून तिचे कौतुक होत आहे.
हा चित्रपट बघण्यासाठी इंड्रस्टीचे अनेक लोकं पोहचले त्यात आदित्य पंचोली हे ही सामील होते. आदित्य आपल्या पत्नी झरीना वहाब यांच्यासोबत आले होते.
ही बातमी मिळताच मीडिया लगेच त्यांच्याकडे पोहचले. आदित्यने न घाबरता म्हटले की मीडिया या गोष्टींना वाव का देत आहे हेच कळत नाहीये. एक प्रेक्षक म्हणून काय मी हा सिनेमा बघू शकत नाही? मी एकाच गोष्टीला धरून ठेवणारा नाही. सिमरन हिट व्हावी अशीच माझी इच्छा आहे, मी तिची प्रगती बघून कधीच जळत नसतो.
उल्लेखनीय आहे की एका साक्षात्कारात कंगना हिने आदित्य पंचोली आणि हृतिक रोशन यांच्याविरुद्ध खूप बोल्ड वक्तव्य दिले होते. ज्यामुळे खूप हंगामा झाला होता.