Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कंगना मुंबईत येताच होणार होम क्वारंटाईन, महापौरांनी केले स्पष्ट

कंगना मुंबईत येताच होणार होम क्वारंटाईन, महापौरांनी केले स्पष्ट
, मंगळवार, 8 सप्टेंबर 2020 (10:24 IST)
“अभिनेत्री कंगना रनौत ही येत्या 9 सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. त्यावेळी तिला नियमानुसार होम क्वारंटाईन केलं जाईल,” अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. “परराज्यातून येणाऱ्या व्यक्तीला नियमानुसार होम क्वारंटाईन केलं जातं. त्यानुसार कंगनालाही होम क्वारंटाईन केलं जाईल,” असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
 
“येत्या बुधवारी (9 सप्टेंबर) कंगना रनौत ही हिमाचल प्रदेशातून मुंबईत येणार आहे. त्यामुळे परराज्यातून आलेल्या व्यक्तीला नियमानुसार होम क्वारंटाईन केले जाते. त्यामुळे नियमानुसार कंगनाच्या हातावरही विमानतळावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जाणार आहे.”
ICMR च्या मार्गदर्शक प्रणालीनुसार, परराज्याततून आलेल्या व्यक्तीला होम क्वारंटाईन करण्याचे नियम आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासन कार्यवाही करेल, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.
 
अभिनेता सुशांत सिंह प्रकरणावरुन कंगनाने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कंगना रनौतला Y+ दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माकडाप्रमाणेच मित्रांचे कान ओढत रहा