Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बॉलिवूडची क्वीन बनली 'हंटरवाली'

बॉलिवूडची क्वीन बनली 'हंटरवाली'
, शनिवार, 14 जानेवारी 2017 (14:33 IST)
बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना राणावत, सैफ अली खान, शाहिद कपूर यांच्या आगामी 'रंगून' या चित्रपटातील पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले असून या गाण्याचे बोल 'ब्लडी हेल' असे असून कंगनाचा हटके लूक या गाण्यात पाहावयास मिळत आहे. कंगना या गाण्यात 'हंटरवाली'च्या अवतारात थिरकताना दिसत आहे. हे गाणे गुलजार यांनी लिहिले असून विशाल भारद्वाज यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. सुनिधी चौहानने गायलेल्या या गाण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा विशाल भारद्वाज आणि गुलजार ही गीतकार आणि संगीतकाराची जोडी एकत्र आली आहे. सध्या या गाण्याचीच चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रवीना टंडन ‘द मदर’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला