Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 25 February 2025
webdunia

करिनाचा बोल्ड अवतार

करिनाचा बोल्ड अवतार
, सोमवार, 18 डिसेंबर 2017 (13:59 IST)
बॉलिवूडची बेबो म्हणजेच करिना कपूर-खान सध्या 'वीरे दी वेडिंग' या आगामी चित्रपटाच्या कार्यक्रमात व्यस्त आहे. त्याचसोबत ती कुटुंबातील महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा हजेरी लावताना दिसते. अलीकडेच तिने नणंद, अभिनेत्री सोहा अली खानच्या पहिल्या पुस्तक प्रकाशनला हजेरी लावली होती. त्यावेळी करिनासोबत पती सैफ अली खान, सासू शर्मिला टागोर आणि नणंद सोहा अली खान आणि तिचा पती कुणाल खेमू दिसले. 'द पेरिल्स ऑफ बीईंग मॉडरेटली' असे तिच्या पुस्तकाचे नाव आहे. या कार्यक्रमात सर्वांच्या नजरा करिनावर खिळल्या होत्या. कारण कार्यक्रमात करिनाने बिभू मोहमात्रा यांनी डिझाईन केलेला फ्रंट  कट ड्रेस परिधान केला होता त्यावर तिने ब्लॅक हिल्स घातले असून, लाल रंगाच्या या वनपीसमध्ये करिना कमालीची सुंदर दिसत होती. या कार्यक्रमात करिनाने सोहाची प्रशंसा केली. करिना म्हणाली की, मी खान कुटुंबातील कुणामुळे सर्वाधिक प्रभावित झाली असेल तर ती सोहा आहे. शर्मिला टागोर यांच्या अनुपस्थित केवळ सोहा ही एकटीच संपूर्ण घर सांभाळू शकते. मी सोहासोबत केवळ शॉपिंगसंदर्भात बोलू शकते किंवा गॉसिप करू शकते; परंतु यातही मी सोहापेक्षा बरीच मागे आहे याची मला जाणीव आहे, असेही तिने सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आज नाटक “अनहद नाद - अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स ”प्रस्तुती