Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 1 May 2025
webdunia

पहिल्याच दिवशी‘टायगर जिंदा है’चं अ‍ॅडव्हान्स बुकिंग हाऊसफुल्ल

tiger jinda hai salman khan katrina kaif
मुंबई , सोमवार, 18 डिसेंबर 2017 (11:12 IST)
‘एक था टायगर’चा सिक्वेल ‘टायगर जिंदा है’येत्या शुक्रवारी म्हणजेच २२ डिसेंबरला रिलीज होणार आहे.’टायगर जिंदा है’चित्रपटाची सुरूवात दमदार होण्याची चिन्हं आहेत. यंदा ख्रिसमसला जोडून आलेला विकेंड अशा सेलिब्रेशनचा मूड सलमान – कॅटरिनाच्या फॅन्ससाठी द्विगुणित करणारा ठरणार आहे. तब्बल पाच वर्षांनंतर सलमान खान आणि कॅटरिना कैफ या जोडीला रूपेरी पडद्यावर एकत्र पाहता येणार आहे.
 
सिनेअ‍ॅनिलिस्ट तरण आदर्श यांनी केलेल्या ट्विटनुसार आजपासून सुरू झालेले ‘टायगर जिंदा है’चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स आणि ऑनलाईन बुकिंग जोमाने सुरू झाले आहे. अनेक ठिकाणी पहिल्या दिवशीच ‘हाऊसफुल’चा बोर्ड झळकला आहे. दरम्यान टायगर जिंदा है’ चित्रपटाचा ट्रेलर युट्युबवर हीट ठरला आहे. त्यानंतर ‘दिल दिया गल्ला’तसेच ‘स्वॅग से स्वागत’या गाण्यांनादेखील चाहत्यांनी रेकॉर्डब्रेक पसंती दिली आहे. त्यामुळे हा चित्रपट येत्या शुक्रवारी बॉक्सऑफिसवर दमदार कामगिरी करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘न्यूटन’ ऑस्कर स्पर्धेतून बाहेर