Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

KK Death KK यांना मानवंदना देण्यात आली, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि कुटुंबीयही उपस्थित

KK Death KK यांना मानवंदना देण्यात आली, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि कुटुंबीयही उपस्थित
, बुधवार, 1 जून 2022 (18:40 IST)
प्रसिद्ध बॉलीवूड गायक कृष्णकुमार कुन्नाथ, ज्यांना KK म्हणून ओळखले जाते, त्यांचे वयाच्या 53 व्या वर्षी कोलकाता येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कोलकाता येथील नजरुल मंच येथे एका लाईव्ह कन्सर्ट मध्ये त्यांना अस्वथ वाटू लागले आणि त्यांचा मृत्यू झाला. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असते असं म्हणतात, याचा प्रत्यय काल ज्या लोकांनी केकेंच्या कॉन्सर्टला हजेरी लावली त्यांना आला असेल. कारण काही वेळापूर्वीच हम रहे या ना रहे असं म्हणणारा केके आता राहिला नाही हे ऐकल्यावर त्याच्या चाहत्यांची काय अवस्था झाली असावी.
 
बॉलिवूडमधले सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ उर्फ केके यांचं कोलकात्यात निधन झालं. केके त्यावेळी एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गात होते. मात्र तिथेच त्यांना अस्वस्थ वाटल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये आणताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.केके यांच्या निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
 
कार्यक्रम सुरू झाला तेव्हा 53 वर्षांच्या केकेंनी अत्यंत आनंदात त्यांचे 2 फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. हीच त्यांची सोशल मीडियावरची अखेरची पोस्ट ठरली. कारण या पोस्टनंतर कार्यक्रमातच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं.
 
"कार्यक्रमाच्या काही वेळानंतर केके स्टेजवरचे फोकस लाईट्स चुकवू लागले. ते स्टेजवरच वारंवार घाम पुसू लागले आणि मध्येच थांबतही होते. मात्र कार्यक्रम संपेपर्यंत ते स्टेजवरून हलले नाहीत.याच कॉलेजच्या फेसबुक पेजवरुन शेअर करण्यात आलेल्या या कॉन्सर्टमधील शेवटच्या काही मिनिटांमध्ये केके 'कल हम रहे न रहें कल.. याद आऐंगे ये पल…' गाणं गाताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. 'यारों दोस्‍ती बड़ी ही हसीन है…' हे गाणंही त्याने या कॉन्सर्टमध्ये गायलं होतं.
 
हा गाण्यांचा कार्यक्रम संपवून ते थेट त्यांच्या हॉटेलवर गेले मात्र तिथेही त्यांना जास्त अस्वस्थ वाटू लागलं. तिथे काही फॅन्स त्यांच्याकडे ऑटोग्राफ मागत होते. पण बरं वाटत नसल्याचं सांगत त्यांनी फॅन्सना ऑटोग्राफ द्यायला नकार दिला. पुढे ते हॉटेलात कोसळले. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं."
केकेंच्या अकाली जाण्याने संपूर्ण बॉलिवूडसह त्यांचे चाहते शोकाकुल झालेत.
 
अल्लू अर्जुन यांनी शोक व्यक्त केला
के.के.जींच्या अकाली निधनाबद्दल कळल्यावर खूप दुःख झाले. त्यांनी माझ्यासाठी अविस्मरणीय गाणी गायली. अनेक पिढ्यांचे आणि वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांचे त्यांच्यावर प्रेम होते. जवळच्या आणि प्रियजनांना शोक. ओम शांती. 
 
हृतिक रोशनने श्रद्धांजली दिली
केकेच्या अकाली निधनाने धक्का बसला आणि दु:ख झाले. तो नेहमीच माझा आवडता गायक राहिला आहे. तुझी आठवण येईल.
 
एआर रहमान यांनी दुःख व्यक्त केले
प्रिय केके.. जल्दी क्या है मित्रा.. तुझ्यासारख्या प्रतिभावान गायक आणि कलाकारांनी हे आयुष्य अधिक सुसह्य केले..
 
केकेच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार असून हे तिघेही आज सकाळी कोलकात्यामध्ये दाखल झाले .गायक केके यांच्या कुटुंबीयांनी कोलकाता येथील रवींद्र सदन येथे गायकाला अखेरची श्रद्धांजली वाहिली.कोलकाता येथील रवींद्र सदनमध्ये गायक केके यांना मानवंदना देण्यात आली. सीएम ममता बॅनर्जी आणि केके यांचे कुटुंबीयही येथे उपस्थित होते.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सलमान खानची सुरक्षा वाढवली