करोनापासून बचावासाठी लतादीदींचा खास सल्ला

बुधवार, 18 मार्च 2020 (12:19 IST)
जगभरात Coronavirus मुळे दहशत पसरली आहे. या प्राणघातक विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी देखील काही विशेष सल्ले दिले आहेत.
 
लतादीदी म्हणाल्या “नमस्कार, सध्या जगभरात फैलावलेला करोना हा एक प्राणघातक विषाणू आहे. मात्र गोंधळू नका, घाबरु नका. सावध राहा आणि अफवा पसरवू नका.”
 
दुसरा ट्विट करत लतादीदी म्हणाल्या की “आपण जबाबदार नागरिक आहोत, स्वच्छता राखा राखण्याची गरज आहे. सर्दी, ताप, खोकला असलेल्या लोकांपासून लांब राहा. डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन करा. सुरक्षित आणि निरोगी रहा!” 
 
अशा आशयाचे दोन ट्विट लता मंगेशकर यांनी केले आहेत. लतादीदीने सोशल मीडियाच्या माध्यमाने आपल्या चाहत्यांसोबत संपर्क साधला आणि काळजी घेण्याचा सल्ला दिला. लतादीदींचे हे ट्विट सध्या जोरदार व्हायरल होत आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख मराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण