Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोदींच्या इंग्रजी ट्विटला ट्रम्प यांनी दिलं हिंदीत उत्तर

मोदींच्या इंग्रजी ट्विटला ट्रम्प यांनी दिलं हिंदीत उत्तर
, सोमवार, 24 फेब्रुवारी 2020 (10:59 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारत आपली वाट बघत असल्याचं ट्वीट केलं. यावर ट्रम्प यांनी हिंदीतून ट्विट करत उत्तर दिलं आहे.
 
मोदी यांनी ट्वीट केलं –
 
India awaits your arrival @POTUS @realDonaldTrump!
 
Your visit is definitely going to further strengthen the friendship between our nations.
 
See you very soon in Ahmedabad.
 
अर्थात ‘भारत तुमच्या येण्याची वाट पाहत आहे. तुमच्या भेटीमुळे दोन्ही देशातील मैत्री आणखी घट्ट होईल. अहमदाबादमध्ये लवकरच भेटू’ असं ट्विट मोदी यांनी केलं होतं. मोदी यांच्या या ट्विटला ट्रम्प यांनी हिंदीतून उत्तर दिलं आहे. 
 
हम भारत आने के लिए तत्पर हैं । हम रास्ते में हैँ, कुछ ही घंटों में हम सबसे मिलेंगे!
 
अर्थात ‘भारतात येण्यास उत्सुक आहे. सध्या वाटेत आहे. काही तासांतच सगळ्यांना भेटू.’ 
 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून 36 तासांच्या भारत दौर्‍यावर आहे. 24 फेब्रुवारी म्हणजे आज ट्रम्प हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात भाषण करतील. डोनाल्ड ट्रम्प प्रथमच भारतभेटीवर येत आहेत. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी मेलानिया सोबत येत आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डोनाल्ड ट्रंप भारतात का येत आहेत?