Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 26 March 2025
webdunia

लॉकडाउनमधील जीवनही सुंदर

लॉकडाउनमधील जीवनही सुंदर
, गुरूवार, 24 सप्टेंबर 2020 (14:51 IST)
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला पुन्हा कामावर परत येण्याची चिंता वाटत नाही. कोरोना काळात इंडस्ट्रीत होणार्या  बदलांचीही तिला काळजी वाटत नाही. तिने लॉकडाउन काळातील जीवनही सुंदर असल्याचे शेअर केले आहे. सोनाक्षी म्हणाली, मला लॉकडाउनचे आयुष्य आवडते असे म्हणायला मला काही हरकत नाही. गेल्या दहा वर्षात मी ब्रेक घेतला नाही, जिथे मी स्वतःसाठी वेळ देऊ शकेन. पण कोरोना काळात मी स्वतःसाठी वेळ काढू शकले. मला आयुष्यातून काय हवे आहे ते समजू शकले. मी या काळात खूप आनंद घेतला आहे, असे तिने सांगितले. ती म्हणाली, मला पुन्हा कामाची सुरुवात करण्याबद्दल काळजी वाटत नाही. मला माहीत आहे की, सेटवर परत येणे खूप अवघड असेल. कारण सद्यपरिस्थितीत सेटवर शूटिंग करताना विशेष खबरदारी घवी लागणार आहे.
 
पीपीई किटमध्ये काम करणारे लोक दिसतील. मी नुकतेच एक फोटोशूट केले होते. त्या वेळी आजूबाजूच माणसांना डोक्यापासून पायापर्यंत झाकून टाकणे आश्चर्यकारक वाटले. हात स्वच्छ करणारे, मास्क घालणे हे नवीन असल्याचे तिने सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ड्रग्ज प्रकरणात दीपिका पादुकोण आणि श्रद्धा कपूरचा असा झाला खुलासा! व्हाट्सएप चॅट काम आले