Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

संजय दत्तच्या बायोपिकमध्ये मनीषा

संजय दत्तच्या बायोपिक
राजकुमार हिरानी बनवित असलेल्या संजय दत्तच्या बायो‍‍पिकमधील स्टार कास्टची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. रणबीर कपूर संजय दत्त साकारणार असून मान्यता दत्तच्या भूमिकेत दिया मिर्झा असेल. या चित्रपटातील सर्वात महत्त्वाची म्हणजे संजयची आई व अभिनेत्री नर्गिसची भूमिका मनीषा कोईरालाकडे आली आहे.
 
राजकुमार हिरानीने या भूमिकेसाठी मनीषाची निवड नक्की केली आहे. ‍नर्गिसचा 1981 साली कॅन्सरने मृत्यू झशला. मनीषाही कॅन्सरमधून बरी झाली आहे. मनीषाची निवड या भूमिकेसाठी करण्यामागे ती सुंदर आहे हे एक कारण असले तरी ती कॅन्सरग्रस्त होती हेही एक कारण असल्याचे समजते.
 
हिरानीच्या मते मनीषाने कॅन्सरच्या वेदना भोगल्या असल्याने नर्गिसने कॅन्सरणी केलेला संघर्ष ती चांगला दाखवू शकते. सुनील दत्त यांची भूमिका परेश रावल करणार आहेत. मनीषाने यापूर्वी संजय दत्त सोबत खौफ, कारतूस, यल्गार, सनम, महबूबा या चित्रपटांत त्याची नायिका म्हणून काम केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

!!ती !!