Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘तलवार २’ची तयारी सुरु

‘तलवार २’ची तयारी सुरु
मेघना गुलजार दिग्दर्शित चित्रपट ‘तलवार’नंतर आता त्याचा दुसरा भाग घेऊन येत आहे. ‘तलवार’ चित्रपटाप्रमाणेच ‘तलवार २’या चित्रपटाची कथाही सत्यघटनेवर आधारित आहे. गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणारा प्रद्युमन ठाकूर या चिमुरड्याच्या हत्याकांडांवर हा चित्रपट आधारित असून यात संपूर्ण कथानकाचे वर्णन करण्यात येणार आहे.
 
रायन इंटरनॅशन स्कूलमध्ये शिकणारा प्रद्युमन ठाकूर हा सात वर्षाचा मुलगा शाळेतील बाथरुममध्ये मृत अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस, सीबीआय परोपरीने प्रयत्न करतात. यामध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप, साक्ष बदलणे, पोलिसांना खोटी माहिती देणे आणि नंतर खूनाचा तपास लागणे यांसारख्या अनेक घटना चित्रपटामध्ये अधोरेखित करण्यात येणार आहेत. तसेच चित्रपटातील वास्तव प्रेक्षकांपर्यंत यथोचित पोहोचण्यासाठी विशाल भारद्वाज या चित्रपटाची कथा लिहिणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रियांका ‘क्वांटिको-३’च्या शूटिंगदरम्यान जखमी