Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Mumbai : मुंबईत लग्नाचं आमिष दाखवून अभिनेत्रीवर बलात्कार, एकाला अटक

rape
, शनिवार, 5 ऑगस्ट 2023 (16:00 IST)
Mumbai :  मुंबईतील एका अभिनेत्रीने टांझानियास्थित एनआरआय व्यावसायिकावर बलात्काराचा आरोप केला आहे. अभिनेत्री ने मुंबईतील एनएम जोशी मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 
 
लग्नाच आमिष दाखवून वीरेन पटेल नावाच्या व्यावसायिकाने तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याचे अभिनेत्रीने ने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय तो मारहाण ही करत असे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, ती आरोपी वीरेन पटेल याला वर्षभरापूर्वी एका पार्टीत भेटली होती. हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढू लागली. त्यानंतर ते एकत्र राहू लागले.आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर शारीरिक अत्याचार केले आणि पीडित अभिनेत्रीने लग्नाचं म्हटल्यावर तिला मारहाण केली.

शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून अखेर पीडितेने वीरेनविरुद्ध एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल केला आहे.पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपी वीरेन वर भारतीय दंड संहितेच्या 376,323 आणि 504कलमानुसार  गुन्हा दाखल केला असून पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
 
Edited by - Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नितीन देसाई यांना कर्ज देणाऱ्या एडलवाईज कंपनीनं अखेर दिलं स्पष्टीकरण