बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे नाव अनेकदा वादात आले आहे. अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर तनुश्री दत्ताने 6 वर्षांपूर्वी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. या बातमीने त्यावेळी सर्वत्र खळबळ उडाली होती. आता वर्षांनंतर नानांनी यावर मौन सोडले आहे
तनुश्री दत्ताच्या म्हणण्यानुसार, 'हॉर्न ओके प्लीज'च्या गाण्याच्या शूटिंगदरम्यान नानांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले होते. या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली.
नुकतेच नाना पाटेकर यांनी त्यांच्यावर लावलेल्या आरोपांबाबत एका मुलाखतीत सांगितले आपल्यावरील लावलेले आरोप खोटे आहेत हे मला पहिल्यापासूनच माहीत होते. यामुळेच मी कधी रागावलो नाही. नाना म्हणाले, 'हे सगळं खोटं आहे हे मला माहीत होतं, म्हणून मला राग आला नाही. हे सगळं खोटं असताना मला राग का यावा? आणि त्या सर्व गोष्टी जुन्या आहेत. सगळ्यांना सत्य माहीत होतं.
ते म्हणाले, मी सोशल मीडियाकडे दुर्लक्ष करतो. सोशल मीडियावर कोण काय बोलत आहे मी या कडे लक्ष देत नाही. कारण मी त्यांना नियंत्रित करू शकत नाही. कोणाचे तोंड मला बंद करता येणार नाही. म्हणून मी या सर्वांकडे दुर्लक्ष करतो. तुम्हाला तुमची सत्यता जाणून घेणं महत्त्वाचं आहे. बाकी लोकांचं काम बोलायचं आहे आणि ते बोलणार.