Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'निरमा' वाद वाढला, मराठी जनतेच्या भावना दुखावल्याची तक्रार

'निरमा' वाद वाढला, मराठी जनतेच्या भावना दुखावल्याची तक्रार
, गुरूवार, 9 जानेवारी 2020 (11:28 IST)
वॉशिंग पावडर 'निरमा'च्या जाहिरातीतून कंपनी आणि अक्षय कुमार यांनी मराठी जनतेच्या भावना दुखावल्याची तक्रार वरळी पोलीस ठाण्यात करण्यात आली. जाहिरातीसाठी मराठा सैन्याचे विकृत चित्रीकरण केल्याने शिवप्रेमींने कंपनी आणि अक्षय कुमारला धारेवर धरले आहे. 
 
सोशल मीडियावर याच्याविरोधात #BoycottNirma ApologizeAkshay #ApologizeNirma आदी हॅशटॅग ट्रेंड होत आहे. तसेच यावर त्वरित योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. लोकांनी अक्षयकडे जाहिरात केल्याबद्दल माफी मागण्यास सांगितले आहे.
 
निरमा पावडरच्या या जाहिरातीमध्ये अक्षयकुमार आणि सहकलाकारांनी मावळ्यांचा वेष परिधान केला आहे. यात राजेच्या भूमिकते अक्षयकुमार युद्ध जिंकून येतो परंतू मळलेले कपडे बघून महाराणींकडून आम्हाला पुन्हा कपडे धुवावे लागणार असे म्हटले जाते. यावर जसे शत्रूला धुता येते तसे कपडेही धुता येतात असे म्हणत अक्षयकुमार व सहकलाकार नाचत- नाचत निरमाने कपडे धुतात. 
 
या अशा जाहिरातीवर लोकांने संताप व्यक्त केला आहे. या वादग्रस्त जाहिरातीमुळे मुंबईतील एका संघटनेकडून अक्षयकुमार विरोधात तक्रार अर्ज देण्यात आला होता. मात्र अक्षयने माफी मागितली असल्याने तक्रार मागे घेत असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘मिस यु मिस’ अश्विनी एकबोटेंना समर्पित