Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

NMACCने पुन्हा आणले 'द ग्रेट इंडियन म्युझिकल: सिव्हिलायझेशन टू नेशन'

NMACCने पुन्हा आणले 'द ग्रेट इंडियन म्युझिकल: सिव्हिलायझेशन टू नेशन'
, बुधवार, 23 ऑगस्ट 2023 (14:38 IST)
देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या थिएटर निर्मितीचे सर्वत्र कौतुक झाले. येत्या  21 सप्टेंबर 2023 पासून ते पुन्हा पाहता येईल.
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या ग्रँड थिएटरने लॉन्च झाल्यापासून देश आणि मुंबईला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय थिएटर शो दिले आहेत. यामध्ये ब्रॉडवे म्युझिकल "द साउंड ऑफ म्युझिक", ऑल-टाइम ब्रॉडवे शो "वेस्ट साइड स्टोरी" सारखे जगातील सर्वोत्कृष्ट शो आणि "चारचौघी", "माधुरी दीक्षित" आणि अलीकडील संगीत मैफिली "यासारखे देशातील प्रतिभा दर्शविणारे अप्रतिम शो समाविष्ट आहेत.

सोना "तराशा ". या सर्वात आणखी एक नेत्रदीपक कार्यक्रम होता ज्या मुळे  ग्रँड थिएटरचे पदार्पण झाले - 'द ग्रेट इंडियन म्युझिकल: सिव्हिलायझेशन टू नेशन'.
 
भारतीय कथेपासून प्रेरित, देशी तारकीय कलाकार आणि भव्य सेट असलेले, 'द ग्रेट इंडियन म्युझिकल: सिव्हिलायझेशन टू नेशन' हे फिरोज अब्बास खान यांनी दिग्दर्शित केले आहे. खान प्रेक्षकांना भारताच्या इतिहास आणि संस्कृतीच्या कलात्मक आणि संस्मरणीय प्रवासात घेऊन जातात ते प्रत्येकाच्या हृदयावर सखोल छाप सोडतो.
 
webdunia
भारतातील सर्वात मोठ्या म्युझिकल शोने सातत्याने अनेक हाउसफुल्ल शो दिले आहेत. सुमारे 38,000 प्रेक्षकांनी हे शो पाहिले. शो संपल्यानंतरही या शोची मागणी कायम राहिली, काही प्रेक्षकांना हा शो पुन्हा एकदा पाहायचा होता. देश-विदेशातील प्रेक्षकांच्या प्रचंड मागणीनुसार हा शो पुन्हा एकदा सादर होत आहे.

यावेळी बोलताना नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या संस्थापक आणि अध्यक्षा श्रीमती नीता अंबानी म्हणाल्या.
“मी अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने घोषणा करते की द ग्रेट इंडियन म्युझिकल: सिव्हिलायझेशन टू नेशन नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये परत येत आहे. हा तो शो आहे जिथे आम्ही भारतातील सर्वोत्कृष्ट जगासमोर आणण्याचा आमचा प्रवास सुरू केला होता. प्रेक्षकांच्या सततच्या मागणीमुळे आम्ही हा शो परत आणत आहोत. प्रत्येक शोच्या नंतर प्रेक्षकांनी ज्या प्रकारे भरभरवून प्रेम व्यक्त केले त्याबद्दल मी आपली आभारी आहे. आपण पुन्हा एकदा त्या आठवणींना उजाळा देऊया आणि या शोच्या माध्यमातून एखाद्या सणाप्रमाणे भारतीय संस्कृतीचा उत्सव साजरा करू या.”आणि नव्या आठवणी ठेऊ या.
 
भारताला समर्पित या शोमध्ये देशाच्या संस्कृतीचा आणि वारशाचा रस आहे आणि अजय-अतुलचे संगीत कानाला गोड वाटते आणि वेशभूषा सुप्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा ​​यांनी केली आहे.
 
हा संगीताचा उत्कृष्ट नमुना म्हणजे भारतीय नृत्य, नाटक, संगीत आणि कलेने भरलेला भारतातील एक अद्भुत प्रवास आहे. गेस्ट कोरिओग्राफर म्हणून  वैभवी मर्चंट आहे तर मुख्य नृत्यदिग्दर्शक मयुरी उपाध्याय, नृत्यदिग्दर्शक समीर आणि अर्श तन्ना आणि ह्यांच्या कला गुणांना मंचावर आणण्यासाठी  आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते लाइटिंग डिझायनर डोनाल्ड होल्डर, व्हिज्युअल डिझायनर नील पटेल, साउंड डिझायनर गॅरेथ आहे. प्रॉडक्शन डिझाइनच्या मागचे मोठं नाव जॉन नरुण यांचे आहे.
 
या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संगीत शोसाठी 2000 आसनांचे ग्रँड थिएटर आदर्श आहे. त्याच्या स्टेजचा  आणि प्रोसेनियमचा प्रभावशाली आकार, अत्याधुनिक डॉल्बी सराउंडिंग सिस्टम, अक्यूस्टिक सिस्टम,  आणि इमर्सिव्ह प्रोग्रामेबल लाईट एखाद्या शोचे मत्त्व वाढवते. 
 
शोचे तिकीट 600 रुपयांपासून सुरू होते. nmacc.com आणि Bookmyshow.com वर तिकीट बुक करता येईल.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Scam 2003 The Telgi Story Trailer Release :स्कॅम 2003 द तेलगी स्टोरी'चा ट्रेलर रिलीज