• मुलांसह ज्येष्ठ नागरिकांनीही हा कार्यक्रम पाहिला.
• रिलायन्स फाऊंडेशनच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फॉर ऑल (ESA) कार्यक्रमाद्वारे समर्थित 18 NGOs सह सहयोग
मुंबई : रिलायन्स फाऊंडेशनने समर्थित NGOs मधील 3,400 वंचित मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी आंतरराष्ट्रीय ब्रॉडवे म्युझिकल 'द साउंड ऑफ म्युझिक' चा आनंद घेतला. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) येथे हा शो आयोजित करण्यात आला होता. रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी हा शो मुलांना समर्पित केला.
आठवड्याच्या शेवटी या दोन अतिशय खास शोसाठी, रिलायन्स फाऊंडेशनने मुंबईतील विविध ठिकाणांहून 3,400 मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना आमंत्रित केले. यामध्ये विशेषतः अनेक दिव्यांग मुलांचा समावेश होता. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फॉर ऑल (ESA) द्वारे समर्थित 18 स्वयंसेवी संस्थांसह रिलायन्स कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी देखील योगदान दिले. सर्वांसाठी शिक्षण आणि क्रीडा कार्यक्रमाद्वारे, रिलायन्स फाऊंडेशन गेली अनेक वर्षे विविध शिक्षण आणि क्रीडा कार्यक्रम आणि उपक्रमांना समर्थन देत आहे. हा विशेष शो रिलायन्स फाऊंडेशनचा मुलांना प्रेरणा देण्याचा आणखी एक प्रयत्न आहे.
विशेष कार्यक्रमात बोलताना, रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा श्रीमती नीता अंबानी म्हणाल्या, “द साउंड ऑफ म्युझिकला मिळालेला उदंड प्रतिसाद हा NMACC च्या दृष्टीकोनाची पुष्टी आहे. देशभरातील कुटुंबे एकत्र येऊन याचा आनंद लुटताना पाहणे खरोखरच आनंददायी असून हृदयस्पर्शी आहे. आम्ही शेवटचे दोन शो 3,400 वंचित मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना समर्पित केले आहेत. या खास प्रेक्षकांसोबत शेअर करण्यापेक्षा या प्रतिष्ठित मैफिलीचा शेवट करण्याचा यापेक्षा चांगला मार्ग असू शकत नाही."
'द साऊंड ऑफ म्युझिक' ने या वर्षी मे महिन्यात द ग्रँड थिएटरमध्ये आठ आठवड्यांच्या ऐतिहासिक रनद्वारे पदार्पण केले - आशियातील सर्वात लांब आणि देशातील अशा प्रकारचा पहिला शो आहे.