Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 21 March 2025
webdunia

Friday Remedies: शुक्रवारी या 4 गोष्टी करा, लक्ष्मीची विशेष कृपा मिळवा

gajlakshmi
, शुक्रवार, 21 मार्च 2025 (05:55 IST)
धार्मिक मान्यतानुसार शुक्रवार लक्ष्मी देवीला समर्पित आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा विधीद्वारे केली पाहिजे. लक्ष्मीला संपत्तीची देवी देखील म्हटले जाते. ज्याला लक्ष्मीचा आशीर्वाद लाभतो त्याला आयुष्यात कधीही आर्थिक समस्येला सामोरा जावं लागत नाही. देवी लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी शुक्रवारी हे 4 उपाय केले पाहिजेत. हे उपाय केल्याने लक्ष्मीची विशेष कृपा होते.
 
देवीला लाल वस्त्र अर्पण करा
धार्मिक मान्यतेनुसार शुक्रवारी देवीला वस्त्र अर्पणे करावे. आपण देवीला सुवासिनीचे सामान देखील अर्पित करू शकता. असे केल्याने, लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते.
 
लक्ष्मीला पुष्प अर्पण करा
शुक्रवारी देवी लक्ष्मीला पुष्प अर्पण करा. शक्य असल्यास, देवीला लाल रंगाचे फुले अर्पण करावे.
 
विष्णूची पूजा करावी
शुक्रवारी श्रीमंतीसाठी विष्णूची पूजा करावी. भगवान विष्णूची उपासना केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते. आर्थिक अडचणींपासून मुक्त होण्यासाठी, प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मी आणि विष्णूची पूजा करावी.
 
खीर अर्पण करा
शुक्रवारी लक्ष्मीनारायण भगवान आणि देवी लक्ष्मी यांना खीर अर्पण करा. हा उपाय केल्यास शुभ फल आणि फायदे मिळतात.
Edited By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Chaitra Navratri 2025: यावेळी चैत्र नवरात्र ९ ऐवजी ८ दिवसांची असेल, शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत जाणून घ्या