अश्लील व्हिडिओ आणि वेब सीरीजच्या निर्मिती संदर्भात मला कोणत्याही कामाची विचारणा झालेली नाही असं अभिनेत्री सई ताम्हणकरने म्हटलं आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना पॉर्न फिल्म्स बनवल्या प्रकरणी अटक झाली आहे.
अभिनेत्री गहना वशिष्ठनं अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यापैकी एक म्हणजे 'हॉटशॉट्स'ला पर्याय म्हणून राज कुंद्रा एक नवीन अॅप लॉन्च करणार होता.
या अॅपवरील चित्रपटासाठी त्यानं त्याची मेव्हणी शमिता शेट्टी आणि मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरच्या नावाचा विचार केला होता, असा दावा तिनं एका मुलाखतीत केला होता.
गहनाच्या दाव्यात काडीमात्र तथ्य नसल्याचं सई ताम्हणकरच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे. राज कुंद्रा प्रकरण आणि त्याच्या कोणत्याही अॅपचा सईचा काहीही संबंध नसल्याचं सईनं स्पष्ट केलं आहे.