Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'नोटबुक' चित्रपटाचा सेट बनवला चक्क तलावात

'नोटबुक' चित्रपटाचा सेट बनवला चक्क तलावात
, मंगळवार, 12 मार्च 2019 (11:58 IST)
जहीर इकबाल व प्रनूतन यांचा 'नोटबुक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जहीर व प्रनूतन दोघे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कक्कड करत आहेत. या चित्रपटाची विशेष बाब म्हणजे या चित्रपटाचा सेट चक्क तलावाच्या मध्यभागी बनवण्यात आला आहे.
webdunia
'नोटबुक' चित्रपटात 2007 सालातील कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात तलावाच्या मध्यभागी असलेल्या एका शाळेवर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. त्यामुळे निर्मात्यांनी या चित्रपटाचा सेट पाण्यात बनवला आहे. हा सेट बनवायला तीस दिवस लागले आणि त्यासाठी 80 लोकांनी चोवीस तास का करून हा सेट बनविला आहे. या सेटचे डिझाईन दोन तरूणींनी केले असून उर्वी अशर व शिप्रा रावल अशी त्यांची नावे आहेत. या सेटबद्दल नितीन कक्कडे सांगितले की, मी वास्तविक ठिकाणी बनवलेल्या सेटवर पहिल्यांदा चित्रीकरण केले आहे. कला दिग्दर्शक उर्वी व शिप्रा यांनी उत्तम काम केले आहे. मला वाटले नव्हते की इतका चांगला सेट बनू शकतो. अशा प्रकारचा सेट बनवणे खूप कठीण होते. मात्र तीस दिवसात आमचे घर बनले. ज्या दिवशी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्णझाले आणि सेट काढायचा होता. त्यावेळी मला खूप वाईट वाटले. या सेटसोबत खूप आठवणी आहेत. ज्या मी कधीच विसरू शकत नाही.'

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

•• स्त्री शिवाय माणूस अपूर्णच ••