Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 10 April 2025
webdunia

पद्मावतीचे चित्रिकरण आता महाराष्ट्रात

padmawati
दिग्दर्शक निर्माता संजय लीला भन्साळी यांच्या वादग्रस्त आणि बहुचर्चित 'द लिजंड आॅफ पद्मावती' या महत्वाकांक्षी हिंदी चित्रपटाचे चित्रिकरण आता महाराष्ट्रात, ऐतिहासिक पन्हाळगडा शेजारील मसाई पठारावर सुरु आहे. या चित्रिकरणात अभिनेता शाहीद कपूर, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग भाग घेणार आहेत. अजून आठ दिवस या परिसरात चित्रिकरण सुरु राहणार आहे. राणी पद्मिनी या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचे विकृत चित्रण भन्साळी हे त्यांच्या चित्रपटात करत असल्याच्या संशयावरुन जयपूर येथे चित्रपटाच्या सेटवर राजपूत करणी सेना या राजपूत संघटनेने जानेवारीत तोडफोड केली. तसेच भन्साळी यांनाही मारहाण केली होती. त्यापाठोपाठ या संघटनेने चित्रिकरणादरम्यान चितोडगड येथेही राणी पद्मिनीच्या शीशमहल येथे घुसून इतिहास प्रसिध्द आरसेही फोडले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सनी लिओनला पसंत आहे असे पुरूष